Ticker

6/recent/ticker-posts

देऊळगावराजा येथे गुटक्याची सर्रास विक्री




मुन्ना ठाकुर 

                            *देऊळगाव राजा* येथे काही दिवसाआधी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक तळ ठोकून असल्याचे नागरिकान मध्ये चर्चा सुरू होती त्यातच तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न व औषध विभाग सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले होते त्यातच देऊळगाव राजा मध्ये मेडिकल तसेच टपऱ्यावाल्याने धास्ती घेत दोन दिवस मेडिकल व पान टपरी बंद ठेवली मात्र कारवाई न झाल्यामुळे परत गुटखा ची सर्रास विक्री चालू केली असल्याचे चित्र दिसत आहे समोरून पान टपरी बंद मात्र मागच्या बाजूने किंवा घरात साठून ठेवलेला गुटखा दुप्पट किमतीने विक्री करत असल्याचे चित्र दिसून येत आहे देऊळगाव माही मध्ये झालेल्या कारवाई मध्ये 54 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र देऊळगावराजा मध्ये ह्याच्या उलट कुठलाही प्रशासनाचा धाक राहिला नाही असे चित्र दिसून येत आहे देऊळगाव राजा मध्ये मोठा प्रमाणात बाहेर गावामधून शिक्षणासाठी तरुण वर्ग राहतो त्यामध्येच हाच तरुण वर्ग याच देऊळगावराजांमध्ये सर्रास होत असलेल्या गुटखा विक्रीमुळे व्यसनाधीन होत चालला आहे यामुळे शिक्षणाच्या वयात शिक्षण साठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वेसण वाढत असून अन्न व औषध प्रशासन या देऊळगाव राजा मध्ये कधी कारवाई करणार ती फक्त बघायची भूमिका घेणार अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे

Post a Comment

0 Comments