Ticker

6/recent/ticker-posts

बऱ्हाणपूर कडून अवैद्य घुटक्याचा ट्रक शेगाव पर्यंत एक चेक पोस्ट आणि दोन-तीन पोलीस स्टेशन ओलांडून येतोच कसा!

  


 *नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह?* 


 शेगाव प्रतिनिधी 

देवचंद्र समदुर 


 13 जून 2026 रोजी रात्री दहा अकराच्या सुमारास खामगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकाने शेगाव वरवट रोडवरील यादव बेकरी जवळ मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका ट्रकला थांबवून ट्रकला चेक केले 50 लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला गेला सदर घटनेने शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाची प्रशासनाच्या करण्यात येत आहे परंतु बऱ्याच नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की बरामपुर मार्ग येत असलेला राजाचा ट्रक शेगाव पर्यंत येण्यासाठी एक चेक पोस्ट आणि जवळपास तीन पोलीस स्टेशन हद्द लागतात पोलीस प्रशासनाची एवढी सज्ज तयारी असूनही लाखो करोडो रुपयाचा गुटखा येतो कसा असा प्रश्न नागरिक करत आहेत 

 शासनाने झाडाच्या फांद्यांना तोडता झाडाचे मूळ तोडावे म्हणजेच गुटखा बनणाऱ्या कंपन्या च बंद केल्या तर गुटखा मिळणारच नाही 

 आज रोजी एवढा लाखो करोडो रुपयाचा गुटखा पकडल्यानंतरही शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी गुटखा विक्री चालू आहे ज्यामध्ये ते मनमानी भावाने विकत आहेत याचा बुकदंड आंबट शौकीन गुटखा धारकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे गुटखा खाणाऱ्यांच्या सवयी बंद करण्यासाठी शासनाने उत्पादक कंपन्यास बंद कराव्यात अशी मागणी सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे 

 

 *अशाप्रकारे शेगाव मध्ये गुटखा पकडण्यात आला* 

बुऱ्हाणपूर ते वरवट बकाल या मार्गावर अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यां ट्रकवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कठोर कारवाई केली आहे. एका मालवाहू वाहनातून नेण्यात येत असलेला तब्बल ५० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे पथक गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की, बुऱ्हाणपूर-वरवट बकाल मार्गावरून अकोला यवतमाळकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलैंड मालवाहू वाहनातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे,


पोलिसांनी तात्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वरवट बकाल ते शेगाव रोडवरील यादव बेकरीसमोर नाकाबंदी केली. रात्री सुमारे १०.१० वाजता संशयित वाहन क्रमांक एमएच ४०-जीटी-२९६५ तेथे येताच पोलिसांनी ते थांबवून चौकशी केली. वाहनचालकाने आपले नाव सुरुर अहमद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) असे सांगितले. वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ वाहनाची तपासणी केली असता, त्यांना धक्काच बसला.


वाहनामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये 'बाजीराव गोल्ड', 'मस्तानी टोबॅको', 'नजर १०००', 'एन-०५ प्रीमियम च्युइंग टोबॅको' तसेच 'प्रीमियम नजर ९०००' या ब्रँडचा माल होता. जप्त करण्यात आलेल्या या प्रतिबंधित मालाची एकूण किंमत ५० लाख १३ हजार ९२० रुपये इतकी आहे. या गुटख्यासह संबंधित मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

Post a Comment

0 Comments