रियाज शेख
मानवत : शहरातील मेनरोड वरील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या मार्केट शाखेचे एटीएम मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सणासुदीच्या कालावधीत पैसे काढण्यासाठी ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेता, एटीएम बंद राहणे ही गंभीर समस्या बनली होती..
ग्रामीण व शहरी भागातील अनेक नागरिक वेळेवर रोख रक्कम मिळवण्यासाठी बँक शाखा किंवा ग्राहक सेवा केंद्रांचा आधार घेत होता. परिणामी, या ठिकाणी प्रचंड गर्दी निर्माण होत होती. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून अनेक वृद्ध व महिलांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता पण सकाळी दैनिक सेवा शक्ती टाइम्स ची बातमी लागताच तत्काळ एटीएम उघडण्यात आले..
0 Comments