Ticker

6/recent/ticker-posts

भारज बुद्रुक गावावर तीव्र पाणीटंचाईचे सावट !


ग्रामपंचायत कडून पाणी टँकरचा प्रस्ताव दाखल 

शंकर डब्बे 

भारज बु-जाफराबाद तालुक्यातील मौजे भारज बुद्रुक येथे तीव्र पाणीटंचाई उद्भवले असून येथील लघु पाझर तलाव आटल्याने गावावर पिण्याची पाण्याची समस्या उद्भवली असून आता नागरिकांना विहिरीवरून किंवा खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागत आहे यंदा प्रथमच 2012 नंतर मोठी पाणी समस्या उद्भवली खरे तर पिण्याचे पाणी धरण क्षेत्रामध्ये राखीव ठेवण्यात येते मात्र कमी झालेल्या पावसाचा परिणाम व बाष्पक भावनांचे परिणाम यामुळे धरण यंदा लवकरच आटले असून त्यामुळे पाणी समस्या निर्माण झाले आहे खरे तर यंदा प्रथमच जल जीवन मिशन अंतर्गत अडीच लाख लिटर एवढे मोठे भव्य असे जलकुंभ उभारले गेले गावांतर्गत पाईप लाईन असे मोठे काम झाले मात्र धरणातच पाणी नसल्याने एवढी मोठी योजना होऊनही पाण्यासाठी राणवन भटकण्याची वेळ का यावी असा एक प्रश्न सध्यातरी उभा राहिला आहे या संदर्भात ग्राम विकास अधिकारी श्री पठाण यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पाणीटंचाईची कबुली दिली आहे मात्र यावर आम्ही वरिष्ठ पातळीवर पाणी टँकर साठी प्रस्ताव दाखल केले असून आठवडाभरामध्ये पाणी टँकरला मंजुरी मिळेल अशी आशा त्यांना आहे गावासाठी इतर पाणीपुरवठ्याच्या विहिरी मधून फक्त 11 हजार लिटर दरडोई पाणी उपलब्ध होऊ लागले असून दिवसाकाठी भारज गावाला एक लाख 44 हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सध्या तरी पाणी टंचाई आहे मात्र आठवडाभर यानंतर प्रशासनाकडून तीन टँकर उपलब्ध होईल त्या एका टँकरमध्ये 24 हजार लिटर पाण्याची क्षमता त्याच्या तीन फेरी गावात होतील त्यामुळे सध्या तरी भारज गावाची पिण्याची पाण्याची समस्या अजून तरी तीन महिने टँकरवर अवलंबून असणार हे मात्र निश्चित झाले आहे त्यामुळे भारज करांना आपल्या पाणी वापराची काटकसर करण्याची सवय आतापासूनच लावावी लागणार असून शेतातील विहिरीची पाणी पातळी जोत्याखाली गेली असून तेही उपलब्ध होणे अवघडच आहे आगामी काळात पाण्याची योग्य नियोजन करणे काळाची गरज बनली आहे



Post a Comment

0 Comments