ज्ञानेश्वर गंगावणे
जाफराबाद, प्रतिनिधी
तालुक्यातील डोलखेडा येथील रहिवासी सरिता भागवत सुळ (वय २५) या विवाहित युवतीचा मृतदेह त्यांच्या माहेर असलेल्या खापरखेडा येथील वडिलांच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरिता सुळ या काही दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. दरम्यान, त्या एक दिवसापासून घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत जाफराबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.
शोधमोहीम सुरू असताना खापरखेडा येथील त्यांच्या वडिलांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत पोलिसांत कोणतीही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास जाफराबाद पोलीस करीत आहेत.
0 Comments