जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा येथील धक्कादायक प्रकार
भागवत चव्हाण
जिंतूर : तालुक्यातील पिंपराळा गावात नागरिकांना अतिसार सदृश्य आजार झाल्यानंतर त्यांचेवर तालुका आरोग्य केंद्रात दाखल करून इलाज करण्याऐवजीमंदिरासमोर चटई अंथरुण गावातच उघड्यावर इलाज केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सोबत ॲम्ब्युलन्स आणि सर्व टीम सोबत घेऊन गेलेले डॉक्टर रुग्णाच्या मर्जीखातर इलाज करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शुक्रवार दि.13 पासून गावातील प्रत्येक घरातील 2/3 महिला पुरुषांना संडास पोटदुखीचा त्रास सुरू होता. त्यावर गावातील आशा वर्कर अंजना डाखोरे यांनी प्राथमिक इलाज म्हणून औषध गोळ्या दिल्या, त्याने फरक पडत नसल्याने चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ.विवेकानंद खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक आणि परिचारिकासह आज सोमवारी दुपारी एक वाजता गावातील हनुमान मंदिरासमोर चटई अंथरुण उघड्यावर 20/25 महिलांना सलाईन लावून इलाज सुरू होता. रुग्णांवर इलाज करणारे चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विवेक खांडरे आरोग्य सहाय्यक मनोज डाके आरोग्य सेविका श्रीमती डोंगरे गट प्रवर्तक श्रीमती भदरगे आशाताई रंजना डाखोरे आरोग्य सेवक रामेश्वर वानकर डॉ जगन्नाथ ढाकरे यांच्याकडून इलाज सुरू होता.
माहिती मिळाल्यानंतर बातमीसाठी गावात जाऊन नागरिक आणि इलाज करणाऱ्या डॉक्टरांकडून उपचार आणि कारण माहिती करून घेतले असता सर्व रुग्णांनी खराब रस्त्याने प्रवास नको म्हणून गावातच इलाज सुरू करावा असे डॉक्टर सांगत आहेत. त्यावरून सर्व रुग्णांवर गावातच इलाज केला असल्याचा डॉक्टरांचे म्हणणे आहे. समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व रुग्णांना चारठाना PHC मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील दूषित पाणी पुरवठा किंवा सार्वजनिक पंगत अथवा जेवणातून असा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विहिरीतील पाण्याचे चाचणी नमुने आज सकाळी बोरी येथील येथील भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागीय प्रयोगशाळा कडे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतरच आजाराचे पुढील कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकारामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. तालुका आरोग्य अधिकारी जाधव यांनी भेट देऊन आजपासून परिस्थिती स्थिर होईपर्यंत गावातील शाळा ताब्यात घेऊन सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून इलाज करणार असल्याचे सांगितले आहे. नेमका हा प्रकार का घडला याचे ठोस कारण पाण्याचे चाचणी नमुने आल्यानंतर स्पष्ट होईल.
या सर्व प्रकाराने जिंतूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कशी चालत आहे याचा अंदाज आला आहे.

0 Comments