40 बसांच्या मागणीपैकी पहिल्या टप्प्यात 10 बस उपलब्ध; शिवसेनेकडून जल्लोषात स्वागत,
कार्यालय/ प्रतिनिधी
मेहकर, प्रतिनिधी
मेहकर आगारासाठी नवीन बस गाड्यांची सातत्याने मागणी करणारे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून मेहकर आगारात 10 नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. या बसांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते बसांची विधिवत पूजा करून नागरिकांच्या सेवेसाठी त्यांचे लोकार्पण करण्यात आले.
मेहकर बस स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार खरात यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आगारासाठी 40 नवीन बस गाड्यांची मागणी केली होती. त्यावेळी 30 बस तात्काळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत पहिल्या टप्प्यात 10 नवीन राजमाता जिजाऊ बस मेहकर आगाराला प्राप्त झाल्या आहेत.
यावेळी आमदार खरात यांनी नव्या बसमधून बस स्थानक ते श्री संत गजानन महाराज मंदिर, पर्वत या मार्गावर प्रवास करत नागरिकांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन सेवेचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मेहकर तालुक्यातील प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. उर्वरित बस गाड्याही लवकरच मेहकर आगाराला मिळाव्यात यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे, असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष किशोर गारोळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव. युवासेना तालुकाप्रमुख अँड आकाश घोडे. नगरसेवक तथा गटनेते विलासराव चनखोरे. नगरसेवक अमर घोडे नगरसेवक नितीन तुपे नगरसेवक महेश रिंढे. नगरसेवक प्रा.सतीश ताजने. गोपाल गायकवाड. साहेबराव हिवाळे. निसार अन्सारी. गजानन निकम. डॉ बदर अमोल बोरे संदिप गारोळे. उत्तमराव राजगुरू दिपक गायकवाड. पवन टाले. विलास शिंदे. गबाजी गवई सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या बस आगमनाचा आनंद साजरा करत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बसमधून प्रवास करून समाधान व्यक्त केले. नव्या बसांमुळे मेहकर आगाराच्या सेवेत भर पडणार असून ग्रामीण व शहरी भागातील हजारो प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.

0 Comments