अनिस शेख
महान -स्थानिक महान आणि परिसरातील पाण्याची सोय असणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कपाशी पिकाची लागवड केली आहे.
कपाशी पिकाची उगवण शक्ती करिता शेतकरी बांधवांनी स्प्रिंकलर, ठिबक सिंचन या द्वारे पाणी देऊन कपाशी ची अंकुर जमिनीबाहेर काढन्यात यश प्राप्त झाले असून आज मृग नक्षत्राच्या ऋतू सुरू होण्यास एक आठवडा उलटला असून अद्याप ही जोरदार,दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने वरून राजा रुसून बसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दिवसेंदिवस उष्ण तापमान वाढत असल्याने विहिरींची भूजल पातळी खालावत असल्याने कपाशी पिकाला पाणी कसे पुरवावे अशी चिंता विहीर, बोअरवेल्स असलेल्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. उष्ण तापमान जास्त प्रमाणात असल्याने कपाशी ची झाडे कुठं पिवळी पडत आहे तर कुठं पाण्याअभावी सुकत असल्याचे चित्र समोर दिसत आहे.
महान व परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केल्याने आज रोजी लागवडीस 15 दिवस पूर्ण झाली असून कपाशीच्या पिकांना डूब्यांचा पहिला फेर सुद्धा शेतकऱ्यांचा झालेला आहे.सदर कपाशी पिकाला पुढील आठवड्यात रासायनिक खतांचा डोस द्यावा लागणार असल्याने जमिनीत ओलावा टिकून राहणे महत्वाचे असल्याने दमदार आणि मुसळधार पावसाची शेतकरी वर्ग आतुरतेने वाट बघत आहेत.
महान व परिसरात या वर्षी शेकडो एकरात शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केल्याचे दिसून येत आहे. शेती मशागती ची कामे शेतकऱ्यांनी आटोपली असून शेत जमिनी पेरणी योग्य झाल्या असून आता समस्त शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहेत. हे विशेष.

0 Comments