Ticker

6/recent/ticker-posts

पारडी गावात अवैध गावठी दारूचा सुळसुळाट; संतप्त महिलांचा आंदोलनाचा इशारा

 ,


मेहकर प्रतिनिधि 


जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पारडी गावामध्ये सध्या अवैध गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असून, यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे. जानेफळ पोलीस सध्या इतर गावांमध्ये अवैध दारू धंद्यांवर धाडी टाकत असले, तरी पारडी गावात मात्र हा बेकायदेशीर व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे सुरू आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या अवैध दारूमुळे अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उध्वस्त होत असून, ग्रामस्थांमध्ये,  महिला वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.पाच वर्षांपूर्वीच्या थरारक हत्याकांडाची आठवण पारडी गावात दारूच्या भीषण परिणामांची पार्श्वभूमी अत्यंत वेदनादायी आहे. पाच वर्षांपूर्वी दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका पित्याने स्वतःच्या पोटच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून त्याची निर्घृण हत्या केली होती. या धक्कादायक घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला होता, तर आरोपी वडील सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अशा भीषण आणि दुर्दैवी घटनेची गावात पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, सध्या गावात घरोघरी सहज दारू उपलब्ध होत असल्याने नागरिक प्रचंड हवालदिल झाले आहेत.तरुण पिढी अन् अल्पवयीन मुले आहारी; महिलांना मानसिक त्राससध्या हाताला रोजगार नसल्याने हतबल झालेली तरुण पिढी आणि अल्पवयीन मुले या सहज मिळणाऱ्या गावठी दारूच्या विळख्यात अडकत चालली आहेत. दारूच्या व्यसनामुळे गावात घरोघरी रोज वादविवाद आणि भांडणे होत असून, याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. महिलांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.बीट जमादारांवर जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोपदिवसाढवळ्या सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांकडे संबंधित बीट जमादार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "अवैध धंदेवाल्यांना नेमके कोणाचे अभय आहे?" असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.तीव्र आंदोलनाचा इशारा पारडी येथील त्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी जानेफळ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना या गंभीर प्रकरणात वैयक्तिक लक्ष देण्याची विनंती केली आहे. गावातील अवैध दारू विक्री तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अन्यथा पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पारडी येथील संतप्त महिला व ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments