Ticker

6/recent/ticker-posts

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मेहकर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटीकेत निषेध मोर्चा



सोमनाथ सुर्यवंशी यांच्या खुणातील आरोपींना बडतर्फ करुन त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा...... प्रा. संजय वानखेडे 


यासाठी ठाणेदार मेहकर यांच्या द्वारे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यासाठी निवेदन !!


गजानन सरकटे 

मेहकर:- परभणी येथे संविधानाची प्रतिकृती जातीवादी व समाजकंटकाकून तोडफोड करण्यात आली आहे परभणी बंदला हिंसक वळण लागले व सोमनाथ सूर्यवंशी वही पेन घेऊन शांतते नांदवळण करत होता. या शांततेने आंदोलन करण्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.तरीसु‌द्धा पोलिसांनी कोंडींग ऑपरेशनच्या नावाखाली 50 निरापराध भीमसैनिकांना विनाकारण अटक केली विधि सूर्यवंशी या एल एलबी च्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला विनाकारण अटक करूा प्रचंड मारहाण केलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी चा पोस्टमार्टम रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू, झाला हे आता सिद्ध झाले आहे तेव्हा सोमनाथ सूर्यवंशीला जबर मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रा संजय वानखेडे यांनी केली मुख्यमंत्री महोदय आपण गुन्हे शाखेंचा पी आय अशोक घोरबाड याने अनेक निर्दोष भीमसैनिकावर जातीय आकाश ठेवून गुन्हे दाखल केले आहे. व ज्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला जबर मारहाण केली त्यांना तत्त्काळ निलंबन करून त्यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे.प्रमुख मागण्या गुन्हे शाखेचा पी आय अशोक घोरबाड याला तत्काळ निलंबित करून याच्यावर गुन्हा दाखल करावा.सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडीमध्ये जबर मारहाण सर्व अधिकाऱ्याला निलंबित करून 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला 50 लाख रुपयाचे आर्थिक मदत तत्काळ करावी.सोमनाथ सूर्यवंशी च्या परिवाराला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावे.संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्या मास्टरमाइंडला मुख्य आरोपींना शोधून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे.परभणी प्रकरणाची एस आय टी जाच करून सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळून दयावा. या विविध मागण्यासाठी मेहकर येथे अशोका वाटी का डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे निषेध मोर्चा व मेहकर चे ठाणेदार यांच्या द्वारे मुख्यमंत्री यांना निवेदन देताना आंबेडकर वादी भिमसैनिक उपस्थित होते या मध्ये सोपान देबाजे ,भीमशक्तीचे विदर्भ नेते किशोर दादा गवई,सुनील शैलेश बावस्कर, भारतीय बुद्ध महासभेचे पीपी वाकोडे, सुनील अंभोरे, आकाश अवसरमोल, प्रतिक देबाजे,तथा जेष्ठ पत्रकार रविन्द्र वाघ, दादाराव खरात , यादवराव वानखेडे , लिलाबाई कटारे गवकर्णा ताई मोरे, सुनिता ताई देबाजे, सुनंदाताई पवार, तुरुकमाने ताई बिबी ताई सरोदे,व मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महिला भगिनी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments