पालक, ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
भागवत चव्हाण
जिंतूर : तालुक्यात दि. ८ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पुंगळा जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरले. शाळेसमोरील जिंतूर-औंढा रोडचे काम सुरु आहे. रोडच्या साईटने नाली न काढल्यामुळे रोडचे पाणी शाळेच्या अंगणात शिरले. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. गुडघाभर पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागले.
पुंगळा जि. प शाळेसमोरुन राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. या मार्गाच्या पावसामुळे रोडच्या साईटला नाली नसल्याने रोडचे पाणी सरळशाळेच्या गेट मधून आतआल्याने शाळेला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये- जा करण्यासाठी तारांबळ उडाली होती. शाळेतले पाणी वसरल्या त्यानंतरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश करावा लागला. या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदरील रोडच्या साईटची नाली काढून पाण्याचा निचरा करावा करावी अशी मागणी गावकरी व मुख्याध्यापक यांनी साबां विभाग एका निवेदनाद्वारे केली आहे. नालीचे बांधकाम न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा पालक, ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
जिंतूर-औंढा रोडचे काम मागील एक वर्षापासून चालू आहे. सदरील पुंगळा पुंगळा गावांमध्ये महामार्ग रोडच्या दोन्ही बाजूने नाल्यांचे इस्टिमेट नसल्यामुळे गुत्तेदारांनी सदरील नाल्याने करण्यास नकार दिला आहे. ग्रामपंचायत पुंगळ्याच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर केले आहे. प्राधिकरणे रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली बांधकाम करुन पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालक, ग्रामस्थांनी दिला आहे.
0 Comments