Ticker

6/recent/ticker-posts

 


जिल्हा परिषदेच्या सीईओचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : ग्रामीण भागातील कर्मचारी- अधिकारी मारतात दांड्या: अनेक विकास कामाची चौकशी सुद्धा नाही

प्रदीप गावंडे 

बार्शीटाकळी /प्रतिनिधी 

अकोला जिल्हा परिषदेच्या महिला सीईओ असल्यामुळे त्या ग्रामीण भागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे विकास कामाचा बट्ट्याबोळ होत आहे, तर दुसरीकडे या सर्व लोकांची मनमानी वाढल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे, सी ई ओ ,ह्या कधी ग्रामीण भागात फिरत नाहीत, आलेल्या तक्रारीची दखल घेत नाहीत, वर्तमानपत्रातील बातमीची सत्यता पडताळून पाहत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे संबंधित कर्मचारी हे फार बेशिस्त झाले आहेत, या बाबीला जबाबदार सीईओ ह्याच असल्याचा आरोप तालुक्यातील लोकांनी केला आहे, 

अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी बी ,वैष्णवी या आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असले तरी, त्यांचे आपल्या कर्मचाऱ्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता ग्रामस्थ करीत आहे, सीई ओ ,ह्या कधी ग्रामीण भागात फिरत नाहीत, कोणत्या कामाची चौकशी करीत नाहीत, आलेल्या तक्रार ची दखल घेत नाहीत, आणि जिल्ह्यातील कर्मचारी विरुद्ध वर्तनपत्रामधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्या फारशा गंभीर दिसत नसत नाहीत, त्यांच्या ह्या गलधनकारभारामुळे ग्रामीण भागातील विकास कामाचा बट्ट्याबळ होताना दिसत आहे, मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे कार्यकाळात ग्रामीण भागातील एकही कर्मचारी मुख्यालई तर,, स्वराज, परंतु, त्यांचे लक्ष नसल्यामुळे सदर कर्मचारी आणि अधिकारी हे दररोज संबंधित गावात सुद्धा जात नाहीत, किंवा कार्यालयात दिसून येत नाहीत, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तीळ मात्र ही त्यांचा वचक नाही, बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अनेक गावातील ग्रामसेवक हे मुख्यालय अजिबात हजर राहत नाहीत, शिक्षकाची तीच बोंबाबोंब आहे, पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांची तीच बोंबाबोंब आहे, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची बंबाबोंब आहे, मुख्यालय तर सोडाच, परंतु दररोज आपल्या गावात सुद्धा येत नाहीत, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शैक्षणिक जीवनाचा बट्ट्याबोळ होताना दिसत आहे, बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या एका जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा प्रचार केला, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, परंतु त्याची विरुद्ध फार कठोर कारवी झाल्याचे दिसत नाही, अशा कारणामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिम्मत वाढली आहे, या सर्व कर्मचाऱ्यांचे अन्य अधिकाऱ्यांचे गाव विकासासाठी कोणतीही प्रयत्न चालवले जात नाहीत, गरिबांना कोणत्याही योजनेची माहिती दिला जात नाही, कर्मचाऱ्यांमध्ये फार मुजोरी वाढल्याचे चित्र दिसून येते, बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पिंजर, राहीत,, टिटवा, उजळेश्वर, मोझरी खुर्द पारा भवानी, टेंभी, जनुना, सालपी, वालपी, इत्यादी गावचे ग्रामसेवक हे दररोज गावात येत नसल्याच्या तक्रारी आहेत, ग्रामस्थांचे कामे सुद्धा करीत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे, या सर्व बाबीची कल्पना सीईओ यांना असताना सुद्धा ते कधी ग्रामीण भागात येऊन सुद्धा पाहत नाहीत, आणि त्याची दखल सुद्धा येत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील कर्मचारी आणि अधिकारी हे वारंवार सतत दांड्या मारत असल्यामुळे विकास कामाचा बट्ट्या बोट झाला आहे, सिंचन विहीर, घरकुल, रमाई घरकुल, शबरी घरकुल, याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याचा आरोप लोकांनी केला आहे, 

पंचायत समिती बांधकाम विभागात एकच शाखा अभियंता: दुसरा नियुक्त केला नाही 

बार्शीटाकळी तालुका हा मागासलेला तालुका असून या पंचायत समितीमध्ये यापूर्वी बांधकाम विभागात दोन शाखा अभियंता कार्यरत होते, पैकी वादग्रस्त शाखा अभियंता किशोर ठेंग यांची बाळापुरात बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी दुसरा शाखा अभियंता अद्याप नियुक्त केला नाही, दुसरा शाखा अभियंता मिळावा म्हणून व्हिडिओ पवार यांनी तसा प्रस्ताव प्रस्ताव सुद्धा जिल्हा परिषदेकडे पाठविला असल्याची त्यांनी आमचे तालुका प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना सांगितले आहे, परिणामी, एका शाखा अभियंत्यावर कामाचा बोजा वाढत आहे, बार्शीटाकळी तालुका हा मोठा असून या ठिकाणी शासनाचे विविध शासकीय कामे सुरू झाली आहेत, परंतु एकच शाखा अभियंता असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे तत्कालीन शाखा अभियंता ठेंग यांच्या सर्व कामाची चौकशी करून त्या ठिकाणी दुसरा शाखा अभियंता त्वरित नियुक्त करावा, अशी तालुक्यातील लोकांची मागणी आहे, असे अनेक किस्से गंभीर असताना सीईओ या गंभीर का नाहीत? अशी चर्चा सुद्धा तालुक्यात होताना दिसत आहे, 

सीईओ प्रामाणिक मात्र, फेरफटका नाही 

अकोला जिल्हा परिषदेच्या महिला सीईओ बी, वैष्णवी ह्या आपल्या कर्तव्यात प्रामाणिक असल्या तरी, त्या कधी जिल्ह्यात किंवा तालुक्यात कधीच फिरकल्याचे दिसले नाही, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शासनाचे कर्तव्य काय असते ?याची जाण करून द्यावी, ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांचे कामे करण्याचे आदेशित करावे, कोणताही कर्मचारी मुख्यालय हजर नाही राहायला नाही तरी चालेल, परंतु तो कर्मचारी दररोज गावात येणे आणि गोरगरीब लोकांचे कामे करणे हे बंधनकारक आहे, परंतु बार्शीटाकळी तालुक्यात तसे होताना अजिबात दिसत नाही, त्यामुळे कर्तव्यात प्रामाणिक असलेल्या सीईओ यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी तालुक्यातील लोकांची आहे, याबाबत सन्माननीय सीईओ यांना शनिवारी प्रतिक्रिया घेण्यासाठी भ्रमणध्वनी केला असता ,त्यांनी प्रतिसाद दिला नाही,

Post a Comment

0 Comments