ऋषी राजेंद्र ठाकरे यांची गगन भरारी.
देऊळगाव साकरशा:- मंजले उन्हीको मिलती है जिनके सपनो मे जान होते है युही पंख होने से कुछ नही होता हौलोसे उडान होती है.
वडिलांचे निधन झाले सर्व कुटुंबाची जबाबदारी अल्पशा वयामध्ये आली यामध्ये जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आज अखेर गाठली यशाची पायरी ऋषीं राजेंद्र ठाकरे वय 23वर्ष असून आज जलसंपदा विभाग मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी सोलापूर येथे निवड झाली आहे .वडिलांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत नसतानाही अगोदर लहान बहीण हिची सुद्धा इंडियन नेव्ही मध्ये भरती झाली होती. आज वडिलांचे स्वप्न पूर्ण करून आपल्या वडिलांना त्याने श्रद्धांजली अर्पण केली. आज ऋषीं चे वडील असते तर त्यांचा आनंद गगनात मावात नाही.धन्य ते वडील आणि माऊली जिने अश्या मुलाना जन्म दिलाय नवऱ्याला भक्कम साथ देऊन संसाराचा गाडा चालवताना आलेल्या अडचणींना नेहमीच तोंड देत आपले मुलं एक दिवस गगनभरारी घेतील या आत्मविश्वास घेऊन ऋषीं च्या आई ने मुलांना कठीण परिस्थिती मध्ये शिक्षण दिले .मुलगी प्राची राजेंद्र ठाकरे ही एक मुलगी 2023 ला इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली त्या नंतर काहीच दिवसा नंतर पती राजेंद्र ठाकरे यांचे आजाराने निधन झाले मुलगी प्रशिक्षण घेण्यासाठी राज्य बाहेर असताना मुलीला वडिलांच्या निधनाची माहिती देऊ नका मुलीचे प्रशिक्षण पूर्ण होऊ द्या मुलीला तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते .या मातेने घेतलेल्या या निर्णया कडे लक्ष देत मुलगा ऋषीं याने मनावर कठोर दगड ठेऊन निर्णय घेतला मुलाने सुद्धा आपले नौकरी चे स्वप्न पूर्ण होवोत म्हणून अथक परिश्रम घेतले शेवटी त्या परिश्रम चे आज फळ मिळाले आहे सोलापूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आपल्या संसारात चड उतार येत असताना मुलाचे व मुलीचे मनोबल व आत्मविश्वास वाढविला ...आज रोजी ऋषीं ठाकरे याने आपले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखविले याबद्दल देऊळगाव साकरशा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप अल्हाट सुरेंद्र कटारे पत्रकार गणेश पाटील राहुल भाऊ गवई यांनी उपस्थित त्यांनी पेढे व हार घालून स्वागत केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या..
0 Comments