Ticker

6/recent/ticker-posts

सामान्य रुग्णालयाचा कार्यालयीन अधीक्षक लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात


वाशिम
:-वैदकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून सही शिक्का घेण्याकरिता 2500 रुपयांची लाच स्वीकारताना  कार्यालयीन अधीक्षक जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम वर्ग -3 सचिन शिवाजीराव बांगर वय 39 वर्ष यांना वाशिमच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवार दि.5 मे रोजी रंगेहाथ पकडले 


याबाबत माहिती अशी कीतक्रारदार यांच्या पत्नीचे वैदकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून सही शिक्का घेण्याकरिता3000 रु  लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 2500 रु स्वीकारण्याचे मान्य केले. व सापळा कारवाई दरम्यान 2500/-रु पंचासमक्ष स्वीकारले.आरोपी सचिन शिवाजीराव बांगर यांच्या विरुद्ध पोस्टे वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कार्यवाही गजानन शेळके,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि. वाशिम. यांच्या पथकाने केली.कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी  केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम  यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments