फिरोजशाह
विशेष बातमी
वाशिम - शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत रिसोड तालुक्यातील ग्राम लेहणी येथे शुक्रवार, २ फेब्रुवारीला पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाच्या जागेचे भूमिपूजन जि.प. सदस्य अमोल पाटील भुतेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला मा.सरपंच परसराम हुले, पवन मोरे, भाजपाचे जेष्ठ नेते कोंडजी मोरे, आदर्श शेतकरी मारोती मोरे, मा सरपंच उकंडी गायकवाड, उपसरपंच सचिन भाले, नायबराव जाधव, गजानन मोरे, रामदास गायकवाड, ज्ञानेश्वर मोरे, आनंदा खनपटे, बापुराव जाधव, प्रदीप मोरे, ज्ञानेश्वर भाग्यवंत, विजय मोरे, पराग पांडे, सुभाष खिल्लारी, राहुल पोहरे, भिकाजी गायकवाड, भिका बाजड, प्रकाश तिफने, बंडु सोनार, सुनिल मोरे, राहुल मोरे, प्रविण भाले, पांडूरंग भाले, अभिषेक गवळी, प्रितम भाले, प्रदीप गावंडे, राजु मोरे, भानुदास गायकवाड यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी अमोल भुतेकर यांच्या हस्ते जलकुंभाच्या जागेचे पुजन करुन व कुदळ मारुन कामास शुभारंभ करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या या पाणी पुरवठयाच्या कामामुळे लेहणी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असून गावकर्यांना दिलासा मिळाला आहे.
0 Comments