फिरोजशाह
राजकिय बातमी
वाशिम:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाशिम जिल्हा महिला अध्यक्षपदी मांगुळ झनक (ता. रिसोड) येथील माजी सरपंच माधवीताई दत्तात्रय झनक यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यावेळी पुण्याच्या मा.महापौर सौ. राजलक्ष्मीताई भोसले, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील गोळे उपस्थित होते.
झनक यांनी याआधी कोरोना काळात अत्यंत संकट समई गावची धुरा सांभाळून कोरोना या विषाणूपासून गाव मुक्त ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांचे संघटन कौशल्य शिस्तबद्धता कमालीची असून त्या उच्चशिक्षित आहेत. यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
या निवडीविषयी बोलताना झनक म्हणाल्या, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकनकर,जिल्हाध्यक्ष युसुफ सेठ पुंजानी,तथा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे या सर्वांनी मला सहकार्य केले व पक्षाची माझ्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जिल्ह्यातील महिलांचे संघटन करुन पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असणार असल्याचे सांगितले.’
0 Comments