Ticker

6/recent/ticker-posts

अखेर.... केनवड ते सावळद रस्त्यावर डांबरीकरण करण्यास सुरूवात...


प्रशांत गोळे पाटील यांच्या मागणीला यश

दैनिक सेवाशक्ती टाईम्स च्या बातम्यांची दखल 


फिरोजशाह

दखल बातमी

वाशिम: केनवड परिसरातील गाव खेड्यांन जुळणाऱ्या रस्त्यांची समृद्धी महामार्ग बनवण्याकरिता सुरू असणाऱ्या कंपनीच्या वाहनांनी रस्त्यांची चाळण झाली होती. त्याची तत्काळ दुरुस्ती कऱण्यात यावी अशी मागणी १९ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे पाटील यांनी MSRDC यांच्याकडे केली होती. त्या संदर्भात MSRDC ने प्रा. प्रशांत गोळे यांना दिनांक २० डिसेंबर २०२३ ला लेखी  आश्‍वासन देखील दिले होते त्याच वेळी याबतीत दैनिक सेवा शक्ती टाईम्स ने वृत्त प्रकाशित करुन संबंधीत यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले होते.अखेर त्या मागणीला उशीरा का होईना यश आले असुन २९ फेब्रुवारी रोजी कामास सुरुवात करण्यात आली. तर होत असलेल्या कामाची पाहणी करुन लवकरच केनवड ते बेलगाव रस्त्या चे देखील काम तात्काळ सुरु करावे व तसेच दोन्ही काम दर्जेदार करण्याची विनंती प्रा.प्रशांत गोळे यांनी MSRDC च्या पळसकर (EE) यांच्या सह सबंधित कंपनीला केले. 

समृध्दी मार्ग बनविण्यासाठी अवजड वाहनातून सामग्री आणल्या जात होती यामुळे केनवड ते सावळद हद्द व केनवड ते बेलगाव हद्द पर्यंत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. यामुळे नागरीकांना ये जा व दळण वळणकरण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता . त्यामूळे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती कऱण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रा.प्रशांत गोळे पाटील यांनी गेल्या 2 वर्षा पासुन सातत्याने केली होती.याची दखल घेऊन रस्ता  नव्याने करण्याचे आदेश MSRDC ने ॲपको कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांनी दिला होता. परंतु वेळ काढूपणा होत असल्याचे निदर्शनास येताच रस्ता बनवण्यास तात्काळ सुरुवात करावी अन्यथा २९ मार्च २०२३ रोजी समृद्धी महामार्ग चक्काजाम करणार असल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे पाटिल सह परिसरातील नागरिकांनी इशारा दिला होता. हा इशारा लक्षात घेऊन सबंधित कंपनीने तत्काळ काम सुरु करु असे आश्र्वासित पत्र प्रशांत गोळे पाटिल यांना दिले होते. त्यानूसार उशीरा का हाईना पण अखेर दिनांक २९ फेब्रुवारी २०२४  रोजी केनवड ते सावळद हद्दिपर्यंत रस्ता बनविण्यास सुरुवात कऱण्यात आली. आणि बेलगाव ते केनवड हा देखील तात्काळ होईल असे देखील MSRDC च्या पळसकर (EE)  यांनी सूचित केल्यामुळे प्रा.प्रशांत गोळे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.


केनवड ते बेलगांव हद्द पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या  प्रतीक्षेतच..

समृध्दी महामार्ग बनविण्यात येत असताना अवजड वाहनांमुळे केनवड ते सावळद हद्द पर्यंत व केनवड ते बेलगांव हद्द पर्यंत रस्त्यांची चाळण झाली होती. रस्ता दुरुस्ती ची मागणी  प्रशांत गोळे पाटील यांनी लावुन धरल्यामुळे त्यांचीच दखल घेऊन केनवड ते सावळद रस्ता दुरस्ती चे काम सुरु झाले आहे परंतु अद्यापही केनवड ते बेलगांव हद्द पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या  प्रतीक्षेतच आहे. त्यामूळे तत्काळ सुरु करण्याची मागणी गोळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments