Ticker

6/recent/ticker-posts

केनवड जवळ चाणक्य ट्रॅव्हल्स बसचा अपघात



फिरोजशाह

अपघात वार्ता 

वाशिम:- नागपूर मुंबई या राष्ट्रिय महामार्गावर रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मालेगाव मेहकर रोडवर केनवड नजिक चाणक्य  ट्रॅव्हल्स क्र.एम एच २९ एम ८४९६ यवतमाळ वरून पुण्याकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या नालीमध्ये जाऊन उलटली.सदर बसमध्ये अंदाजे 35 ते 40 प्रवासी प्रवास करत असल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली त्यानुसार ट्रॅव्हल्स च्या केबिनमध्ये बसून प्रवास करीत असलेल्या 8 ते 10 लोकांना किरकोळ मार लागल्याने पुढील उपचारासाठी वाशिम येथे 108 अँब्युलन्स ने पाठविण्यात आले असून इतर प्रवासी सुखरूप आहेत यामधे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु अपघात घडताच घटनास्थळावरून वाहन चालकांने पळ काढण्याचे तिथे उपस्थित नागरिकांचे म्हणणे होते.


शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केनवड समोर संदीप हॉटेल जवळ ३० ते ४० प्रवासी घेऊन प्रवास करणारी चाणक्य ट्रॅव्हल्स चा अपघात झाला. बसच्या वाहकाने दिलेल्या माहितीनुसार समोरील काच अचानकपणे सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले.यामध्ये आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली. परंतु धक्कादायक माहिती अशी की  दुर्घटनाग्रस्त झालेली बसच्या मागेच विद्युत पोल होते. तसेच समोरच्या दिशेने पाच ते सात फुटाच्या अंतरावर बाभळीचे झाड होते दुर्दैवाने ही बस जर या दोन्ही वस्तूंच्या संपर्कात आली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.

Post a Comment

0 Comments