अंकोश राठोड
विशेष बातमी
मेहकर :- गाव चलो अभियानांतर्गत बहुजन समाज पार्टी मेहकर विधानसभेच्या वतीने मेहकर विधानसभा क्षेत्रातील कळमेश्वर सेक्टर ची सभा दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी एक वाजता महापुरुषांना अभिवादन करून संपन्न झाली. सदर सभेचे मार्गदर्शक म्हणून प्रभात खिल्लारे प्रदेश सचिव यांनी बाबासाहेबांच्या अथक परिश्रम आणि त्यागामुळे आम्हाला सर्व काही मिळत आहे. त्यांना बेईमान होऊ नका असा कळकळीचा संदेश उपस्थितना देऊन, विद्यमान बीजेपी सरकार आणि काँग्रेसच्या दलित विरोधी आणि संविधान विरोधीनितीचा खरपूस समाचार घेतला . बाबासाहेबांच्या विचाराचे आचरण करणारा आणि सविधानालाच पक्षाचा अजेंडा माणनारा बसपा भारतातील एकमेव पक्ष आहे . बहुजन समाज पार्टीला महापुरुषांची विचारधारा सतत तेवत ठेवण्यासाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एकसंघ भारतासाठी बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो बहेन कुमारी मायावती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी नागपूर झोन इन्चार्ज अविनाश वानखडे आणि बुलढाणा जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) संजय गवई यांनी सुद्धा समयोचीत मार्गदर्शन केले.
वेळेअभावी संतोष जुमडे मेहकर विधानसभा अध्यक्ष , मुंदेफळ येथील राधाताई अवसरमोल, शशिकलाताई मिसाळ ,आशाताई सरकटे, वंदनाताई वानखडे, पार्वती ताई जाधव, वंदनाताई वानखडे, छायाताई मिसाळ, पार्वती ताई जाधव, पंचफुला ताई मिसाळ, कळमेश्वर येथील राधाताई अंभोरे, रंजनाताई अंभोरे, लताताई अंभोरे, वंदनाताई मिसाळ, विमलताई अंभोरे, सुभद्राबाई अंभोरे , सावत्रा येथील सुरज मिसाळ,मनोहर घेवदे ,अजय मिसाळ, धार येथील राजानंद वानखडे पाचला येथील रमेश गवई यांनी उपस्थितांना अभिवादन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसपा चे जिल्हा महासचिव दिलीप सरकटे ,भारत कंकाळ माजी सरपंच दुधा, वढव ता. लोणार येथील संजय वाठोरे , गजानन राजगुरू, हिवरा आश्रम येथील प्रवीण धंदर , मुंदेफळ येथील राधाताई
अवसरमोल , कळमेश्वर येथील रंजनाताई अंभोरे, महेंद्र गवई ,अमोल अंभोरे, रंजनाताई अंभोरे यांनी विशेष परिश्रम घेतले
थार येथील राजानंद वानखडे, पाचला येथील रमेश गवई, सावत्रा येथील सुरज मिसाळ, मनोहर घेवदे,अजय मिसाळ, कळमेश्वर येथील सचिन सरकटे, महेंद्र गवई, अमोल अंभोरे, यांचे विशेष परिश्रम लाभले
कार्यक्रमाला पंचक्रोशीतील बहुसंख्य महिला,पुरुष आणि तरुण मुलं हजर होते. बसपा निशितच इतिहास घडवेल असा आशावाद आणि विश्वास सर्वांनी व्यक्त केला
कार्यक्रम संपल्यानंतर महापुरुषांच्या नावाच्या आणि बहुजन समाज पार्टी तथा बहेन कुमारी मायावती यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देउन परिसर दणाणून सोडला . संपुर्ण वातावरण बसपामय झाले होते.

0 Comments