Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामसभेचे आयोजन सदस्यांची मात्र अनुपस्थिती


पिंपरी सरहद्द येथे ग्रामसभा संपन्न


वाशिम:- रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द येथे सोमवार दि.२८ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन सरपंच स्वप्निल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. परंतू ग्रामसभेला तीन सदस्यांनी या सभेकडे पाठ फिरवली यामुळे गावचा कारभार कसा चालणार? सदस्य गण ग्रामसभेला अनूपस्थित राहत असतील तर मासिक सभेचे काय होत असेल अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

स्थानीक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ग्रामसेवक मुऱ्हेकर, तलाठी ससाणे, कृषि सहाय्यक आरु, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक,आशा सेविका उपस्थित होते. ओबीसी प्रवर्गातील नागरीक आवास योजनेच्या यादीमध्ये ज्या नागरिकांची नावे समाविष्ट नाहीत अशा नागरिकांचे नव्याने नाव समाविष्ट करणे, एस.सी प्रवर्गातील आवास योजनेसाठी नाव समाविष्ट करणे, मेंढी पालन, कुक्कुटपालन, गोठा, सिंचन विहीर यासाठी योजनेचा कृती आराखडा तयार करणे, अतिक्रमण, जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येत होत असलेल्या घसरण बाबत पालक सभेचे आयोजन करणे, पीक पाहणी करणे, अशा महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली. सदर ग्रामसभा ही शांततेत पार पडली.

Post a Comment

0 Comments