मेहकर तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा
गजानन सरकटे
दुःखद बातमी
मेहकर शहराचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचे दुःखद निधन झाले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांचे लहान बंधू होते. छत्रपती संभाजीनगर मधील हॉस्पिटलमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज २५ ऑगस्ट च्या दुपारी अडीच वाजता सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००६ मध्ये संजय जाधव मेहकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले होते. अडीच वर्षे त्यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.दरम्यान गेल्या काही दिवसापासून ते लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. व जगाला त्यांनी अखेरचा निरोप दिला. संजू भाऊ जाधव यांच्या निधनाची वार्ता पसरताच मेहकर तालुक्यासह बुलढाणा -वाशिम जिल्ह्यावर शोककळा पसरली.
संजय जाधव यांच्यावर सायंकाळी जानेफळ रोडवरील स्मशानभूमीत अत्यंत संस्कार केले जाणार आहे.
0 Comments