Ticker

6/recent/ticker-posts

पावसाचा हाहाकार...... बळीराजाला उरला नाही आधार....!


सरसगट मदतीची मागणी 


फिरोजशाह

विशेष बातमी 

वाशिम:- जिल्ह्यात मागील ३-४ दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे शेतातली मातीसह पिके खरडून गेली. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गत वर्षी पाऊस उशिरा आला. यामुळे पेरण्या देखिल खोळंबल्या होत्या. मागिल काही दिवसापूर्वी अल्पस्वरूपाचा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या.सद्यस्थितीला डवरणी योग्य पिके बरहरली होती. माञ मागील ३ते ४ दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील कोवळ्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.तरी प्रशासनाने सरसगट  मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला होता परंतु पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या होत्या सोयाबीन, तूर ,हळद, कापूस या पिकांचे अंकुर बहरले होते .शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण मानला जाणारे खरीप पिके आहेत. ही पिके  चांगल्या स्वरूपात बहरले  होते. परंतु मागील तीन ते चार दिवसापासून रिसोड तालुक्यातील केनवड, गणेशपुर, कोयाळी, जोगेश्वरी, जायखेड , कुकसा, अंचळ, पिंपरी सरहद्द परिसरामध्ये निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. काल दि. २४ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे या सगळ्या पिकांसह शेतातील माती देखील खरडून गेली. यामुळे पिकांसह शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणून शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केल्या जात आहे. महसूल प्रशासन ६५मिलिमीटर पडलेल्या पावसाच्या निकषानुसार मदत देत असतो. यामुळे शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण केनवड मंडळात ४५ मी मी पावसाचे नोंद झालेली आहे.परंतु शेजारील मंडळ तसेच बुलढाणा जिल्ह्यातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याने शेती अक्षरशः खरडून गेली. यामुळे सदर शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याची भीती  व्यक्त केली जात आहे. तरी निकष न लावता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


केनवड सह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस काल पाडला यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे तहसीलदार यांनी मोचक्या स्वरूपात केले. यामुळें नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सरकारमध्ये आम्हाला अशाचे किरण वाटतात. दादांनी तात्काळ दखल घेऊन शेतींचे पंचनामे न करता सरसगट मदत जाहीर करावी . शासन ६५ मी. मी.पावसाच्या नोंद नुसार मदत जाहीर करत असते. परंतू केनवड परीसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे निकश न लावता मदत जाहिर करावी.

प्रशांत गोळे

प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस 



मागिल काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. काल मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला. पिकांची पेरणी करुन काहीच दिवस झाले आहेत. सद्या पिके कोवळी आहेत. मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाचे सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करावी.

विष्णुपंत भुतेकर

संस्थापक अध्यक्ष

भूमिपुत्र शेतकरी संघटना


Post a Comment

0 Comments