अभिष्टचिंतन...
मैदानातील एक फलंदाज : अंकुश राठोड
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे|गोमटे की... देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे||
या उक्तीप्रमाणे मेहकर मतदारसंघातील घाटबोरी येथील एक युवक पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्राच्या मैदानात आपलं एक अढळ स्थान निर्माण करतोय. नावाप्रमाणेच सक्षम,उदार, सर्जनशील, कधी कधी गंभीर आणि सतत आनंदी असणारे दैनिक सेवाशक्तीचे संपादक अंकुश राठोड यांचा आज वाढदिवस...
प्रत्येक सामन्याच्या सुरवातीला, दोन फलंदाज आणि क्षेत्ररक्षक मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळायला सुरुवात होते. तेव्हा मात्र खेळपट्टीवर फलंदाज क्रीजमध्ये उभा राहुन चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी फलंदाज अडवाअडवी करतोय आपली भूमिका निभावतो. अगदी त्याचप्रमाणे अगदी कमी कालावधीत लेखणीच्या जोरावर , मैदानात उतरुन चौकार, षटकार ठोकून फटकेबाजीपूढे समोरच्यांना घायाळ करत फेल केले. तु,तर एक विक्रमचं करुन दाही दिशा आपल्या नावाचा डंका उज्ज्वल केला आहे.
आज पत्रकारितेच्या मैदानात आम्हाला जे,साधलं नाही,ते तू साधलं, अन् तुला खरोखरच ते तुला जमलं, तुझा तो निर्भीडबाणा, मितभाषीपणा, चांगल्या चांगल्याला घायाळ करणारा असुन, *आज मैदानात आयुष्याला 'चार चॉंद' लागले.* आहेत. मित्रा, अंकुश तुझ्या व्यक्तिमत्त्वावर लिहण्यासाठी एक दोन पानांत तुला बांधण होणार नाही. पुर्ण दिवस गेला तरी लिहिणं होणार नाही. कारण संघर्षाच्या आगीतून तू तावून सुलाखून निघालेला असल्याने, तूला त्याची जाणीव असल्यामुळे तू आज आपल्या दैनिकातून सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध बंड करत आहेस. सर्वसामान्याला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेस. त्यामुळे तुझं व्यक्तिमत्त्व लिहिणं आता सोपं नाही, तु,दहा वर्षांच्या अगोदरचा अंकुश नसुन आता अंकुशराव झाला आहेस.
प्रिय मित्रा वाढदिवसाच्या प्रेमळ,सौज्जळ, प्रांजळ, ओंजळतील फुलांचा वर्षाव... वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!
✒️ संतोष अवसरमोल (पत्रकार)
मु.पो.घाटबोरी,ता.मेहकर
मो:-9689777129
🌹💐❤️🌴❤️🎂🎂
0 Comments