Ticker

6/recent/ticker-posts

सावधान; महिला चोरट्यांची टोळी सक्रिय

 


पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

फिरोजशाह

क्राईम बातमी

वाशिम:-रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द येथे दिनांक २५ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही महिला लहान मुलांसह भंगार वेचण्या करण्याकरिता गावात आल्या होत्या. चक्क या महिलांनी घरातील उपयोगी साहित्य चोरले. ही बाब स्थानीक नागरिकांच्या लक्षात येताच महीला चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही महीला गावातून बाहेर पडण्यास यशस्वी झाल्या तर एका महिलेला त्याच्या लहान मुलासह गावातील महिलांनी पकडले. सदर वेचलेल्या भंगार मध्ये घरातील उपयोगी वस्तू भगोने, बकेट, स्टो, स्टीलचे गंगाळ व इतर बारीक वस्तू या आढळून आल्या. याबाबत सदर महिला विचारणा केली असता त्या महिलेने सांगितले की सदर वस्तू ह्या लहान मुलाने नजरचुकीने घेऊन आला असेल असे सांगून गावकऱ्यांना दमदाटी केली व अंगावर मारण्याकरिता गेल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच सदर चोरटी महिला "चोर तो चोर सिना जोर" असे करीत असल्याचे निदर्शनास आले. तरी सद्यस्थितीला पावसाळा सुरु झाला आहे.दरम्यान शेती मशागतीचे कामाला सुद्धा वेग आला आहे. दरम्यान गावात शेतकऱ्यांसह मजूर वर्ग दिवसा कमीच गावात  दिसून येत आहे. या दरम्यान अशा चोरट्यांना संधी मिळू शकते तरी याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन अशा चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments