Ticker

6/recent/ticker-posts

सेवाध्वज अखेर सन्मानपूर्वक फडकला.

 


अ.भा.तांडा सुधार समीतीची मागणी तीन दिवसात पूर्ण.

संदिप राठोड

खामगांव : -अखिल विश्वातील बंजारा व वंचित समाजाची क्रांतीभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरागड येथे १२ फेब्रुवारी २३ रोजी मोठा गाजावाजा करीत लाखो लोकांच्या उपस्थितीत सेवाध्वजाची स्थापना करण्यात आली होती. "सेवालाल बोलो पोहरागड चालो", "एक दन समाजेसारू" अशा घोषणा देत भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने जनता या ठिकाणी एकवटली होती.

    महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवाध्वजाची स्थापना करून याच दिवशी संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. परंतु  शासन व प्रशासनाचे या ध्वजाकडे  दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अखिल भारतीय तांडा सुधार समितीने शासन व प्रशासनाकडे केली होती. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने व वादळाने ध्वजाचे कापड पूर्णपणे फाटले होते. कापडाच्या नावावर केवळ चिटोराच त्या ठिकाणी शिल्लक असल्याची तक्रार अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी केली होती. व तीन दिवसाच्या आत नवीन कापड लावून सेवाध्वज सन्मानपूर्वक फडकत रहावा अशी मागणी केली होती. 

 त्यामुळे येत्या तीन दिवसात फाटलेल्या सेवाध्वजाला नवीन कापड लावून ध्वजाची शान व मान कायम ठेवण्याची  मागणी डॉ. प्रकाश राठोड, प्रा. सरदार राठोड, डॉ. सुभाष जाधव, नामा बंजारा, मोहन जाधव इ. तांडा सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. तांडा सुधार समितीच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने तीन दिवसात सेवाध्वजाला  नवीन कापड लावून ध्वजाची शान व मान राखल्यामुळे नामा बंजारा यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

मातब्बर मंडळीचे दुर्लक्ष

मागील चार महीन्यांपुर्वी श्रीक्षेत्र पोहरागड येथे १२ फेब्रुवारी ०२३ रोजी मोठा गाजावाजा करित लाखों लोकांच्या व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह अख्या मंत्रीमंडळांच्या साक्षीने सेवाध्वजाची स्थापना करण्यात आली होती. मात्र या सेवाध्वज व संत सेवालाल महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्यांकडे शासन व प्रशासनातील अधिकारी,बंजारा समाजातील स्थानिक नेतेमंडळी, व धार्मिक मंडळी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या तीन दिवसात सेवाध्वजला कापड  लावण्यात यावे अशी  मागणी वाशिम जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना व्दारे केली होती.

    अखिल भारतीय तांडा सुधार समिती च्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने 3 दिवसातच सेवाध्वज लावण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments