![]() |
| शितल संतोष जाटाळे 89.50 तृतीय क्रमांक |
अव्वल तीनही मुली नव्वदीपार, शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
केनवड श्री. ज्ञानेश्वर आदिवासी, मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ, गणेशपूर :- व्दारा संचालित केनवड येथील ओम नमः शिवाय विश्व आदिवासी आश्रमशाळेने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी दहावीत तीनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.आदिवासी आश्रमशाळेचे अध्यक्ष विश्वनाथजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आदिवासी आश्रमशाळा नावारूपाला आलेली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात आदिवासी विदयार्थी प्राविण्य प्राप्त करीत आहेत. नुकतेच या शाळेतील माजी विदयार्थी सैन्यदलात दाखल होत देशसेवा बजावणार आहेत. दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा शाळेला लाभलेली असून, संस्था सचिव दिपकभाऊ शेवाळे यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक मुख्याध्यापक मनिकांत मिसाळ, माध्यमिक मुख्याध्यापक अनिलकुमार गोळे, पदविधर शिक्षक रूपेश अभ्यंकर व वर्गशिक्षक, विषयशिक्षक, अधिक्षक, अधिक्षीका आणि कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदिवासी आश्रमशाळेतील विदयार्थ्यांच्या विकासासाठी परिश्रम घेत असतात.यावर्षीच्या निकालात कशिश बाळू खुळे हिने 91 टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला तर 90.20 टक्के गुण घेत आरती पांडूरंग जटाळे व्दितीय तसेच 89.50 टक्के गुण प्राप्त करीत शिवानी गजानन झाटे व शितल संतोष जटाळे या तृतीय क्रमांकावर आल्या आहेत. मुलांमध्ये अजय संतोष फुफाटे 88.60 टक्के प्रथम, राहुल उदेभान हांडे 87.20 व्दितीय तर प्रविण प्रकाश करवते 87 टक्के गुण मिळवित तृतीय आला. या दैदिप्यमान यशाबददल संस्था अध्यक्ष विश्वनाथजी शेवाळे यांनी विदयार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन करित पुढील उज्वल यशासाठी विदयार्थ्यांना सदिच्छा दिल्या आहेत.



0 Comments