कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हर्रास झालेल्या कापसाचे किंमत जिना मध्ये करतात शंभर ते दीडशे रुपयांनी कमी !
देवचंद समदूर
भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कापूस हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे गेल्या काही वर्षापासून कापसावर बोंडआळी मुळे पहिलेच शेतकरी त्रस्त झालेला आहे त्यातही उत्पादन खर्च जास्त आणि कापसाला भाव कमी यामुळे बरेच शेतकरी कापसाकडे पाठ फिरवत आहेत
गेल्या दोन महिन्यापासून कापसाचे भाव कमी झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरीच साठवून ठेवला होता परंतु गेल्या दोन-तीन दिवसात कापसाला थोडीफार तेजी आल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला सुरुवात केली परंतु येथेही जिनिंग फॅक्टरी मालकाकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे
असाच प्रकार अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हर्रास झालेल्या कापसाच्या संदर्भात झालेला आहे सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक एक जून 2023 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत हर्रास झालेले कापसामध्ये शेतकरी सत्यपाल श्रीकृष्ण नीतोने राहणार चंडिकापूर या शेतकऱ्यांचा कापसाचा बाजारभाव ठरला होता 7400 परंतु ही कापसाची गाडी जेव्हा जय किसान जिनिंग फॅक्टरी मध्ये खाली करण्यास गेली तेव्हा तेथील खरीदार जिनिंग मालक यांनी या कापसात कवडी जास्त असल्याचे सांगून कापसाला प्रति क्विंटल शंभर रुपये प्रमाणे भाव कमी करून गाडी खाली केली तसेच देवचंद्र समदुर यांच्या कापसाला 7750 चा बाजार भाव ठरला असून मुठभर कापूस अल्पशा जळालेले सारखा दिसत असल्याने 150 रुपये प्रति क्विंटल भाव कमी केला
व कमी केलेल्या भावात कापूस देसाल तर खाली करतो अन्यथा कापूस वापस घेऊन जा अशा प्रकारचे उद्धट उत्तरे देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून कमी भाव फरकाने कापूस घेतात शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस आणण्यासाठी भाड्याने वाहन गाडी सांगावी लागते जवळपास अडीच हजार ते तीन हजार रुपये गाडी भाडे द्यावे लागते त्यामुळे कापूस बाजारात परत टाकल्यास हे भाडे अंगावर बसेल आणि आपल्याला कापूस त्याच भावात पडेल या कारणांनी शेतकरी नाईलाजास्त्व आपला कापूस हरास भावापेक्षा कमी भाव फरकाने देतो जिनिंग फॅक्टरी मालक ज्या फरकाने सांगेल त्या फरकाने द्यावा लागतो परंतु हा कापूस देताना तो शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठा उभा असतो शेतकऱ्यांना व्यापारी कापायला बसलेल्या आहे व्यापाऱ्यांना मात्र शेतकऱ्याच्या भावनांचा तीळमात्रही फरक पडत नाही आणि शेतकरी हे दुसऱ्या दिवशीचे गाडी भाडे आणि लागत असलेला वेळ वाचवण्यासाठी कमी भाव फरकाने कापूस देतात हे येथील जिनिग व्यापाऱ्यांना चांगल्या प्रकारे ओळखून आहेत. करिता अकोट येथे सर्रास अशा प्रकारची लूट केल्या जाते करिता या संबंधित गैरप्रकारावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लक्ष आहे किंवा नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे सदर गैर प्रकारात होत असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी आणि संबंधित जिनिंग फॅक्टरी व्यापाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथे येत असलेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
" कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हर्रास झालेल्या कापसाचे भाव जिनिंग मालक स्वतः कमी करू शकत नाही त्याकरता जिनिंग मालकाने सदर माल हरास झालेल्या मालापेक्षा वेगळा असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन आणि समितीच्या कर्मचाऱ्यांशी मालाची पाहणी केल्यानंतर खरोखर माला तफावत असल्यास समिती कर्मचारी त्या ठिकाणी कमी फरकाने व्यापारी हारास करू शकतो,"
दाळू साहेब सचिव
कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट
0 Comments