अजित चव्हाण
कळंब- : तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब ता.कळंब जि.धाराशिव या शाळेचा एसएससी बोर्ड परीक्षा मार्च २०२३ चा शंभर टक्के निकाल लागला असून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे एकमेव माध्यमिक मूकबधिर विद्यार्थ्यांची शाळा आहे. मूकबधिर असूनही इतर मुलांसारखे आम्ही कोणत्याही गोष्टीत कमी नाहीत हे मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. प्रत्येक वर्षी प्रमाणे या ही वर्षी धाराशिव जिल्ह्यातून- आकाश पवार ७७.६०% प्रथम, कविता वायबसे ७५. ४०% द्वितीय,सुजाता वाकडे ७५. २०% तृतीय, श्रावणी घुले ७३.८०%, समाधान शिंदे ६९.२०%, शुभदा शिंपले ६७.४०%, विशेष प्राविण्य ०३, प्रथम श्रेणी ०३ असे घवघवीत यश मिळवले आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव चे संचालक सचिव शहाजी चव्हाण व शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, विषय शिक्षक आश्रुबा कोठावळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments