Ticker

6/recent/ticker-posts

जानकी देवी विद्यालयाचा 97टक्के लावुन उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम





चिखली:- स्थानिक भारत शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगाव घूबे द्वारा संचालित जानकी देवी विद्यालयाचा निकाल या वर्षीही  दहावीचा निकाल नुकताच घोषित झाला असून या वर्षीही विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या वर्षी एकूण 91 परीक्षार्थींनी परीक्षा दिली त्या पैकी 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. निकालाची टक्केवारी 97 टक्के आहे.

या मध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी कु पल्लवी बद्रीनाथ जाधव ने 89.80 टक्के गुण संपादन करून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.तर  प्रेरणा शेवत्रे 89.40 टक्के गुण मिळवित दुसऱ्या क्रमांकावर शुभम शिवदास शिंगणे 89.20 गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर  तर लक्ष्मी विजय घुबे ने 88.80 टक्के गुण घेत चवथा क्रमांक मिळविला आहे.90 ते 85 टक्के गुण घेऊन 25 विद्यार्थी 80 ते 85टक्केगुण घेऊन 27 विद्यार्थी 75 ते 80 गुण घेऊन 20 विद्यार्थि 60 ते 75 टक्के गुण घेऊन 15 विद्यार्थि उत्तीर्ण झाले आहेत.आरती पुरी 88.40 ओम तळेकर 88.20 तेजस्विनी इंगळे 87.80 गायत्री जंजाळ 87.80 गायत्री अवचार 87.60 गायत्री झालटे 87.20 अश्विनी प्रवीण घुबे 87.20 असे गुण ह्या विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेनफडरावजी घूबे, संचालक प्रा. उद्धवराव घूबे, प्राचार्य हरिदास जी घूबे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परीसरातील पालकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असुन पुढील काळातील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments