Ticker

6/recent/ticker-posts

जरीता काकडे व पूजा सुर्वे ठरल्या अहिल्याबाई होळकर महीला सन्मान पुरस्काराच्या मानकरी

 




फिरोजशाह

वाशिम महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महिला व ग्रामविकास विभाग अतंर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायती मधुन दरवर्षी दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त पुरस्कार वितरीत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत दुबळवेल  ता.मालेगाव वतीने गावातील महिला बचत गटातील स्वयंसेवी संस्था या मधुन दोन महिलांची निवड करून  सरपंच चंद्रकांत सुभाष देवढे यांच्या हस्ते जरीता विष्णू काकडे व पुजा सुरेश सुर्वे यांचा सत्कार प्रमाणपत्र शाल व पाचशे रुपये देऊन गौरव करण्यात आला.यावेळी सरपंच चंद्रकांत सुभाष देवढे पाटील,माजी सैनिक सुखदेवराव नानोटे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष देवढे पाटील,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष रामकृष्ण नानोटे, ग्राम पंचायत सदस्य मोतीराम पोफळे, स्वाती हनुमान गोटे, आम्रपाली यशवंत सुर्व ,मनकर्णा राऊत,वंदना आव्हाळे,मिलिंद राऊत,ग्रामरोजगार सेवक महादेव लबडे, संगणकचालक रविकुमार देवढे,आंगणवाडी सेविका पदमिना सुर्व,वंदना पाटील,व्दारकाबाई वानखेडे,शिपाई यशवंत सुर्व,नयुमखॉ पठाण,दत्तराव काकडे,हनुमान गोटे, विष्णू काकडे,वामन नानोटे, माजी सरपंच गणेश केळकर,वैष्णव देवढे, व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments