विजय चव्हाण
पारखेड: गोर सिकवडी सामाजिक संघटना भारत व ग्रामपंच्यात यांच्या संयुक्त विद्यमाने पारखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवरामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गोर सिकवडी सामाजिक संघटना भारत चे संयोजक गोर विलास रामावत यांच्या कल्पनेतून गरजू रुग्णांना दवाखाना आपल्या दारी या सदराखाली संकल्पना साकारत मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन केल्याने गावातील तसेच परिसरातील ३०० गरजू रुग्णनि नोंदणी करून मोफत तपासणी व मोफत औषध उपचार करून शिबिराचा लाभ घेतला शिबिरामध्ये लागणारे औषधी पवार एजन्सी फार्मसिटीकल अंबड,व सत्यसाई बाबा एजन्सी बुलढाणा यांच्या सहकार्याने या शिबिराकरिता बुलढाणा मेहकर खामगाव येथील तज्ञांनी व श्री सत्य साईबाबा ट्रस्ट बुलढाणा यांचे योगदान लाभले या शिबिरात बुलढाणा येथील नेत्र तज्ञ डॉ संदेश राठोड,डॉ.जी.बी.राठोड,स्त्री रोग तज्ञ,डॉ.अनिल राठोड शल्य चिकित्सक, डॉ.प्रशांत राठोड,राठोड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर,डॉ.गुलाब पवार एम. डी. मेडिसिन खामगाव डॉ.वडते बालरोगतज्ज्ञ बुलढाणा डॉ.जितू पवार,डॉ.शारीक व्यधकीय अधिकारी देऊळगाव साकरशा, डॉ.काळे वैधकीय अधिकारी जानेफल,डॉ.सपना काळे वैधकीय अधिकारी देऊळगाव साकरशा,डॉ.योगेश डवंगे वरवंड तसेच प्राथमिक आरोग्य केंद जानेफल,देऊळगाव साकरशा येथील कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे सदस्य श्री तेजराव जाधव,खरेदी विक्री संघाचे संचालक मोतीचंद राठोड,प्रा.विशाल जाधव,विजय चव्हाण,राष्ट्रीय बंजारा परिषद,सुभाष रामावत,होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कावरशिंग जाधव,जय जाधव,राजेश राठोड,संजय पवार,यांनी परिश्रम घेतले.


0 Comments