Ticker

6/recent/ticker-posts

मेरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर चालू असलेल्या खोली बांधकामात लाखोचा भ्रष्टाचार



अनिल दराडे 

सिंदखेडराजा:-ठेकेदाराने चक्क काळ्या मातीवरच केले कॉलम उभे,बोगस चालू असलेल्या कामावर मुख्याध्यापक व शाळा समितीची चुप्पी.शाळेच्या खोली बांधकामावर चक्क अवैध रेतीचा वापर,ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम पडघान व इतर गावातली मंडळी यांनी केली चालू असलेल्या बोगस कामाची पोलखोल 

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेचे खोली बांधकाम चालू आहे त्या बांधकामावर ठेकेदारामार्फत अवैध  बोगस रेतीचा वापर तसेच चक्क काळ्या मातीवर लोखंडी कॉलम उभे करण्यात आले आहे. शाळा खोली बांधकामात ठेकेदारमार्फत लाखोचा भ्रष्टाचार होत असल्याचे  पुरूषोत्तम पडघान  व इतर गावकरी मंडळी यांच्या  पाहणीत समोर आले आहे. विद्यार्थ्यांचे हित पाहता शासनाने लाखो रुपये शाळेच्या खोली बांधकामावर मंजूर केले, मागील पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर  काळ्या मातीवर असलेले फाउंडेशन वर उभी असलेली इमारत शाळा सुरू होण्याच्या अगोदर कोसळल्या होत्या पण कोणतीही जीवित हानी झाली नव्हती,पण आज जे काम सुरू आहे ते पण निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे या कामावर शासनाच्या कोणत्या अधिकाऱ्याचे लक्ष नसल्यामुळे सदर काम हे थातूरमातूर सुरू आहे याची दखल शासनाने घेऊन त्या संबंधित ठेकेदाराचे लायसन रद्द करण्यात यावे शासन आज या कामावर नवीन खोली बांधकामासाठी लाखो रुपये निधी मंजूर करण्यात आला व त्याचे काम सुरू झाले पण  ठेकेदारामार्फत थातूरमातूर पद्धतीने खोली काम सुरू असल्याचे ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम पडघान पाटील  व इतर गावकरी मंडळी यांच्या पाहणीत आढळले. त्यामुळे  पुरुषोत्तम पडघान मुख्याध्यापकासह संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी जिल्हा अधिकारी बुलढाणा यांच्याकडे करणार आहे.

Post a Comment

0 Comments