गजानन कहाळे
आडगाव राजा येथील डाक घर किमान चार ते पाच दिवसा पासून बंद असते कधी अकरा साडे अकरा वाजता उशिरा उघडत असल्याने असल्या या कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार सुरु आहे. व या पोस्ट ऑफिस अंतर्गत किमान सात ते आठ गावे येत असल्याने जवळ पास च्या लोकांचे खूप हाल होत आहे. व विनाकारण नाहक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आडगाव राजा येथे पोस्ट ऑफिस असल्या ने कुठली हि सेवा लोकांना दिली जात नाही, ना कुणाचे आर्टिकल वेळेवर दिले जाते, ना इंडियन पोस्ट पेयमेन्ट बँक चे व्यवहार सुद्धा होत नाही, ना सुकन्या समृद्धी यौजनेचे खाते निहाय माहिती देत नाही. ना (RD) FD )व SB कुठलेच व्यवहार होत नसल्याने लोकांना त्रास होत आहे व ऑफिस च्या प्रथम दर्शनी भागात कर्मचाऱ्याचे वेळापत्रक सुद्धा लावण्यात येत नाही. अशी परिस्थिती असतानि वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या कडे लक्ष देत नाही त्यांना पाठीशी घालत आहे अखेर ऑफिस धूळ खात पडणार कि काय याकडे गावकर्यांचे लक्ष वेधले आहे.

0 Comments