धिरज राठोड़ –
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आज दि. १८ रोजी एका ह्युंडाई व्हर्ना गाडीमधुन काही इसम एम डी (MD) (Mephedrone) नावाचा अंमली पदार्थ दारव्हा मार्ग घेवून जाणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने क्षणाचाही विलंब न करता सदरचे कारवाई करीता लागणारी सर्व प्रकारची पुर्तता व परवाणगी प्राप्त करून घेवून वरिष्ठांचे मार्गदर्शनात मानकोपरा ता. दारव्हा परिसरात सापळा लावुन थांबले असतांना वर्णनाप्रमाणे वाहन येतांना दिसल्याने सदर वाहनास पोलीस स्टॉफ चे मदतीने थांबवुन वाहन चालक व वाहनात असलेल्या इतर व्यक्तीचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे युनुस खान अमीर खान पोसवाल वय ३६ वर्षे, रा. लोहारा लाईन पांढरकवडा, वसीम उर्फ राजा खान अक्रम खान वय ३४ वर्षे, रा. पठाण चौक सुन्नी मस्जीद जवळ अमरावती,सैयद इरशाद उर्फ पिंटु सैयद गीस वय ३५ वर्षे, रा. इकबाल कॉलणी बेगम बाजार अमरावती असे सांगीतल्याने त्यांना कारवाई संबंधाने सविस्तर माहिती देवून त्याची अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे ड्रायव्हर सिट बाजुला असलेल्या डॅशबोर्ड वरील डिक्कीत एका पाऊच मध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळुन आल्याने त्यांना पावडर बाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचे पावडर है MD (Mephedrone) नावाचा अंमली पदार्थ असल्याचे सांगीतले त्यावरून पंचासमक्ष सदरचे MD (Mephedrone) अंमली पदार्थ १४९.६ ग्रॅम बाजार मुल्य प्रतिग्राम ११.३२,८००/- चे तसेच त्याचे ताब्यातील ०३ जुने वापरते मोबाईल व वाहन हुऺडाई वर्ना क्रमांक एम.एच.४९ बी ७०८२ किमंत ५,००,०००/- रु असा एकूण १६,४७,८००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी युनुस खान अमीर खान पोसवाल, वसीम उर्फ राजा खान अक्रम खान, सैयद इरशाद उर्फ पिंटु सैयद गोस यांचे ताब्यातील वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांचे विरुध्द पो.स्टे. दारव्हा येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, प्रदिप परदेशी पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गणेश बनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, पोउपनि योगेश रंधे, राहुल गुहे पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, बंडु डांगे. अजय डोळे, रुपेश पाली, साजीद सैयद, निलेश निमकर, सुधीर पांडे, निलेश राठोड, ऋतुराज मेडवे, अमीत झेंडेकर, मिथुन जाधव, रजनिकांत मडावी, धनराज श्रीरामे, बबलु चव्हाण चालक नरेश राउत, जितेंद्र चौधरी व सायबर सेल येथील मपोशी प्रगती कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments