भव्य नागरी सत्कार समारंभ
गजानन सरकटे
मेहकर -तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तीन कर्तृत्ववान पुरुषांना व महिलांचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने केली आहे.आपला प्रस्ताव पाठविण्याची अंतीम तारीख २५/मे/२०२३ अशी आहे. कला,साहित्य,सामाजिक,उद्योग,शिक्षण,युवक,युवती,राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगले काम करणार्या पुरषांना व महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उध्देशाने हा पुरस्कार सोहळा राबविण्यात येणार आहे २८ मे २०२३ रोजी आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार या पुरस्कारांचे गावपातळीवर वितरण होणार आहे यामध्ये सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल गुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यासाठी इच्छुक कला,साहित्य,सामाजिक,उद्योग,राजकीय,सांस्कृतिक,पत्रकार, पोलीस, डॉक्टर ,वकील, शिक्षक, आशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आशा गुणीजनांना पुरस्कार वितरण व जेष्ठ नागरिक, माजी सैनिक यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.तरी इच्छुकांनी आपला प्रस्ताव तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
त्या अनुषंगाने सामाजिक कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान सामाजिक क्षेत्रातील पुरुष, महिलांनी आपला कार्य अहवाल तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांच्याकडे सादर करण्याचे अहवान यांनी केले आहे..
0 Comments