Ticker

6/recent/ticker-posts

ऊर्जा स्रोतांचे संवर्धन काळाची गरज- प्राचार्य, डाॅ. बालाजी लाहोरकर

 


गणेश राऊत 

विशेष बातमी                 .         

मेहकर:- भारत या वर्षी G-20 चे अध्यक्षस्थान भूषवत आहे. त्यानिमित्त भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पर्यावरणपूरक जीवनशैली व ऊर्जा स्रोतांचे संवर्धन या विषयावर कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिंधूताई जाधव महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.  बालाजी लाहोरकर उपस्थित होते. त्यांनी पर्यावरणपूरक जीवन शैलीचा अवलंब अनिवार्य असल्याचे म्हटले अन्यथा पुढील पिढीसाठी जीवन अतिशय खडतर होईल, असे सांगितले. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य, डाॅ. गणेश परिहार यांनी भूषवले त्यांनी अक्षय ऊर्जा वापरावर भर देण्याची गरज असल्याचे व्यक्त केले. प्लास्टिक बंदी, प्रदूषण नियंत्रण करण्यात कठोर कारवाई करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. संजय दांदडे यांनी केले, त्यांनी कार्यशाळा आयोजनाची भूमिका व विद्यार्थ्यांचे कर्तव्य विशद केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश सावजी यांनी तर आभारप्रदर्शन ग्रंथपाल प्रवीण जोशी यांनी केले. कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. ओमराज गजभिये, डॉ. प्रमोद हुंबाड, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान पर्यावरणपूरक जीवन अवलंब करण्याची शपथही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Post a Comment

0 Comments