Ticker

6/recent/ticker-posts

चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुन्ना ठाकूर 
क्राईम बातमी
देऊळगाव राजा :-बुलढाणा जिल्ह्यात दिनांक 13 मे रोजी पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीतील ग्रामरोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरात सहा वर्षीय चिमुकलीची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाल्याने या घटनेमुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. कोणतेही पुरावे या नराधामाने मागे सोडले नसल्यामुळे पोलिसांमुळे आरोपी शोधण्याचे मोठे आवाहन समोर थाटले होते. पोलिसांनी तपास चक्र फिरवत रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विकणाऱ्या 24 वर्षीय सदानंद भगवान रोडगे या नराधमास 17 मे रोजी गजाआड केले. 12 मे रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील चिमुकली आपल्या आई-वडिलांसह रोहडा (चिखली) तपोवन देवी संस्थान येथे लग्न समारंभात आली होती.त्याच दिवशी सकाळच्या सुमारास ती चिमुकली बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा बराच शोध घेतला परंतु ती दिसून न आल्याने आल्याने मुलीचे आईचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन अंढेरा येथे अप क्र १३३/२०२३ भादवि कलम 363 प्रमाणे अपराध दाखल केले. सदरचे गून्हाच्या अनुषंगाने सुनील कडासने पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या सूचनेने प्रमाणेतपास पथके तयार करून मंदिर परिसराची बारकाईने पाहणी केली असता मंदिरात चे मागील बाजूस सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेले नाल्यामध्ये मुलीचा मृतदेह दगडाच्या ढीगाऱ्याखाली लपून ठेवलेल्या स्थितीत मिळून आला त्यावरून सदर गुन्हाचा प्रकार अत्यंत संवेदनशील असल्याचे दिसून आल्याने दाखल गुन्ह्यांमध्ये भादवि कलम 302 364 201 प्रमाणे कलम वाढ करण्यात येऊन विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर तथा देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांचे नेतृत्वात मेहकर आणि देऊळगाव राजा विभागातील आणि स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा व सायबर सेल बुलढाणा येथील पोलीस अधिकारी अमलदार यांची विविध तपास पथके नेमून पुढील तपास केला. सदर गुन्ह्यांमध्ये प्रथमदर्शक कोणताही पुरावा नसताना तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आपले कौशल्य पनास लावून अथक परिश्रम घेऊन तपासा दरम्यान मंदिर परिसरातील व आजूबाजूच्या गावांमध्ये सखोल तपास व गुप्त बातमी काढून केलेला तपास प्रमाणे दिनांक 17 मे रोजी संशयित आरोपी नामे सदानंद भगवान रोडगे वय 24 वर्ष राहणार ग्राम रोडा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांस ताब्यात घेऊन परिस्थितीजन्य पुराव्यांचे आधारे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यातील मयत पिढी मुलीचे पोस्टमार्टम रिपोर्ट आज रोजी प्राप्त झाला असून त्यामध्ये आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून हुमालाच्या साह्याने गळा आवळून तिची हत्या केली असल्याचे नमूद असून त्याप्रमाणे योग्य त्या कायद्या व कलमाप्रमाणे कलम वाढ करून पुढील अधिक तपास करीत आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणीस स्थानिक नागरिकांनी केली.
नराधाम आरोपी 


Post a Comment

0 Comments