अकोला ते पातुर्डा पायदळ रॅलीचे आयोजन
भन्ते ज्ञानज्योती,भन्ते विनयपाल व भन्ते नागज्योती यांची प्रमुख उपस्थिती...
देवचद्र समदुर
सामाजिक बातमी
शेगांव:- अकोला येथील बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या सम्राट अशोक वाटीका ते पातुर्डा येथील ऐतीहासीक विहीर अशी पायदळ रॅली दी. २३ मे मंगळवार रोजी सकाळी भन्ते ज्ञानज्योती,भन्ते विनयपाल,भंते नागज्योती,यांचेसह जेष्ठ श्रेष्ठ पन्नास ते साठ भन्तेजीच्या प्रमुख ऊपस्थीतीत निघणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने पावन झालेली ऐतीहासीक विहीर आहे. दि. २९ मे १९२९ रोजी डाॅ. बाबासाहेबांच्या हस्ते या विहीरीचे अनावरन झाले होते.अशी माहीती मीळते. ९४ वर्षापुर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पातुर्डा या गावात तिन दिवस मुक्कामी होते. त्याकाळी रेल्वेच्या एक्सप्रेस मेल ला शेगाव येथे थांबा नव्हता त्यामुळे २८ मे रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जलंब येथे ऊतरुन बैलगाडीद्वारे पातुर्डा येथे गेले होते. बाबासाहेबांची बैलगाडी ज्या-ज्या मार्गाने गेली होती त्याच मार्गावरुन ही पदयाञा जाणार आहे. त्यामुळे या ऐतीहासीक क्षणाला व स्थळाला अनन्यसाधारन महत्व प्राप्त झाले आहे. येथे दरवर्षी २९ मे रोजी पातुर्डावाशी व विवीध सामाजीक,राजकीय संघटणा कार्यक्रम घेत असतात. या वर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच पातुर्डा येथील ऐतीहासीक विहीर प्रागणातील विहारात तथागत बुद्धाच्या मुर्तीची प्रतीष्ठापना होणार आहे.
त्यानुसारच ताडोबा (चंद्रपुर) येथील अभयारण्यात जंगली व हिस्ञ पशुपक्षात राहून ध्यान साधना करणारे भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर हे अकोला येथील अशोक वाटीकेपासुन पातुर्डा येथे पायदल रॅली करणार आहेत. त्यांचे समवेत भन्ते विनयपाल महाथेरो यांचेसोबतचं पन्नास ते साठ भन्तेंचा जथ्था तसेच बौद्ध ऊपासक/उपासीका राहणार आहेत.
श्रामनेर दिक्षा शिबीराचे आयोजन
दरम्यान १९ मे पासुन श्रामनेर दिक्षा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दौर्याचा सविस्तर रुपरेषा लवकरच कळविण्यात येणार असुन ज्या गावातुन,शहरातुन ही धम्मरॅली जाणार आहे त्पांना अगोदरच सुचित करण्यात येईल.उन्हाची तिव्रता बघता गावकर्यांनी सावलीसाठी साजेसा मंडप,थंड पाणी,शरबत, भोजनदानाची व्यवस्था करावयाची आहे.तसेच श्रामनेर दिक्षा शिबीरात,पायदळ रॅली व बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना व मिरवणुकीकरीता सर्व समाजबांधवांनी उत्साहाने सहभागी व्हावे.
अशी सुचना वजा आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार प्रमुख बौद्धाचार्य सुरेश गव्हांदे जलंब यांनी केले आहे.
0 Comments