रवी राठोड
पालघर नगरपरिषद रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे मात्र इतक्या वर्षात नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविण्यात नगरपरिषद सपशेल अपयशी ठरल्याने नगरपरिषद क्षेत्रातील समस्या व उपायोजनाबाबत बहुजन विकास आघाडी पालघर शहरातर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले. या समस्यांबाबत नगरपरिषदेने तातडीने दखल घेऊन कामे मार्गी लावावीत अन्यथा धरणे आंदोलन करून समस्यांना वाचा फोडण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे नगरपरिषदेस देण्यात आला. यावेळी आमदार राजेश पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.पालघर नगर परिषद क्षेत्रात दिवसेंदिवस लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे मात्र नागरिकांना नगर परिषदेतून अपेक्षित अशा सुविधा मिळत नाही शहरातील काही प्रमुख रस्ते सोडले तर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे शहराला बकालपणा आला आहे. फुटपाथ दुकानदारानी व्यापले आहेत, हात गाडीवाले कुठेही गाड्या लावून खाण्याचे पदार्थ विकत आहेत. यात नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष देण्यापेक्षा नगरपरिषद या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. असाही आरोप बहुजन विकास आघाडी पालघर शहराकडून नगरपरिषदेवर करण्यात आला आहे.यावेळी बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील, बहुजन विकास आघाडीचे पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पी. टी. पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतन पाटील, सुदेश दीक्षित, मिलिंद साखरे, राजेशमनी त्रिपाठी, कामनिष राऊत, नचिकेत राऊत, निखिल गायकवाड, अनिल पाटील, धीरज पाटील, डायमंड चड्डा, रुपेश पवार, यश जैन आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments