Ticker

6/recent/ticker-posts

अबब.... जल जीवन मिशनच्या कामांमध्ये सावळा गोंधळ



 धिरज राठोड

दारव्हा तालुक्यातील मौजा वरुड ग्रामपंचायत ला जलजीवन मिशन अंतर्गत विहीर आणि पाईपलाईन व टाकी बांधकाम करिता लाखो रुपयाचा निधी मंजूर झाला असून वर्ष लोटो नाही विहीर अधिग्रहणाचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतलेले नसल्याने गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिंपळगाव गावामध्ये विहीर नसताना किंवा विहीर अधिग्रहण केलेली नसताना पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे विहिरीचा पत्ता नाही पाईपलाईन मध्ये पाणी कुठून आणणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असून सदर ग्रामपंचायत ने विहिरीसाठी जागा अधिग्रहण न करता निविदा प्रक्रिया पार पाडली निविदा काढल्यानंतरही ग्रामपंचायतने विहीर अधिग्रहणासाठी कुठलाही पाठपुरावा केलेला नसल्याचे जनतेमधून बोलल्या जात आहे

  जल जीवन मिशन ही योजना शासनाने ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे या उदात्त हेतूने जरी तयार केली असली तरी या पोशाखातील कंत्राटदारांनी सदर योजनेला या नियम धाब्यावर बसून अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचे पहावयास मिळते काही पांढऱ्या पोशाखातील राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींनी सदर योजनेवर आणि विभागावर आपला चांगलाच जम बसविलेला दिसतो सदर योजना लाखो आणि करोड रुपयांचीच असते सदर विभागाकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष सुद्धा नसते नेमका याच संधीचा फायदा घेऊन सदर विभागाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने सदर योजनेला कुरण बनविले आहे अशी चर्चा कार्यालयाच्या परिसरात ऐकावयास मिळते सदर विभागाचे अधिकारी सुद्धा आपलं स्वतःचं भलं करून घेण्याच्या तयारीत असल्याचेच भासवीत आहे विभागाच्या अंदाजपत्रकानुसार कामे केल्या जात नाही अंदाज पत्रिकेतील साहित्य विवरणामध्ये नमूद असलेल्या साहित्याचा वापर सुद्धा करण्यात येत नाही अत्यंत निकृष्ट आणि लोकल साहित्यांचे वापर करून सदर कामाला पूर्णविराम देण्याचा मानस कंत्राटदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांचा असतो त्यामुळे जनतेसाठी आलेला निधी जनतेसाठी कमी अधिकारी आणि कंत्राटदार यांचाच जास्त फायदा होत असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे उपविभागीय अधिकारी महसूल दारव्हा यांनी विहीर अधिग्रहणासाठी परवानगी दिल्यानंतरही परवानगी मिळून वर्ष लोटले तरीही अद्याप पर्यंत विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही यामध्ये आपण हे अपयश कोणाच्या खात्यात टाकायचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग की ग्रामपंचायत या दोघांचीही सांगड असल्याने गावकऱ्यांची पंचायत होताना दिसून येत आहे कंत्राट दाराकडून शासकीय नियमाने काम करून घेण्याकरिता जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग उपविभागीय अभियंता शाखा अभियंता यांची जबाबदारी असते ज्यांच्यावर जबाबदारी आहे शासकीय नियमानुसार काम करून घेण्याची तेच अधिकारी कंत्राटदाराच्या दावणीला असल्याने गुणवत्तेची अपेक्षा करायची तरी कुणाकडून असा प्रश्न उपस्थित झालेला आहे पिंपळगाव मध्ये विहिरीचे अधिग्रहण झालेले नसताना पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे सदर विषय घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे दोन वेळा तक्रार करूनही चौकशी  गुलदस्त्यातच असल्याने न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडून करावी असा प्रश्न गावकऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही तर गावकऱ्यांना आणखी किती वर्ष सदर कामाच्या संदर्भामध्ये प्रतीक्षा करावी लागेल हे येणारा काळच सांगू शकेल प्रतिक्रिया तक्रारी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी तक्रारी संदर्भाने कुठलीही चौकशी करीत नसल्याने संबंधित विभागावर सुद्धा शंका उपस्थित केल्या जात आहे अधिकाऱ्यांनी तरी गप्प का बसावे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सदर बाबीची गंभीर दखल घेऊन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कामासंदर्भात आदेश देऊन पिंपळगाव वाशी यांना न्याय द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काही दिवसापूर्वी बैठक घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जलजीवन मिशनचे काम लवकरात लवकर तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते समोर तोंडावर पावसाळा असल्याने पावसाळ्यापूर्वी जलजीवन मिशनची संपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग दारव्हा आणि ग्रामपंचायत वरुड पिंपळगाव यांना जाग आलेली दिसत नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना तर होत नाही ना अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे

Post a Comment

0 Comments