मुन्ना ठाकूर
दे.राजा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे जेवढे विद्यार्थी वस्तीगृहात आहे त्यांना निष्कृष्ट दर्जाचे होस्टेल बाहेर मिसची व्यवस्था करून देण्यात आली आहे, वसतीगृहातील स्वच्छतागृहांमध्ये अतिशय घाण आहे वेळोवेळी त्याची योग्य ती स्वच्छता होत नाही, तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांचा फोन वार्डन घेत नाही व विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेत नाही तसेचविद्यार्थ्यांना फोन लावण्यास मज्जाव करित् असल्याचे दिसून येत असल्याची तक्रार तहसीलदार यांच्या मार्फत केली आहे,तक्रारीत पुढे असे ही सांगितले की वस्तीगृहामध्ये राहणारे विद्यार्थ्यांचे भत्ते ही मागील सात-आठ महिन्यापासून मिळाले नाही, तसेच विद्यार्थ्यांना सकाळी कोणत्याही प्रकारचा नाश्ता भेटत नाही सदर वस्तीगृहाचे वार्डन वस्तीगृहामध्ये राहत नाही महिन्यातून एक ते दोन वेळा वस्तीगृहात चक्कर मारतात व विद्यार्थ्यांनी याबद्दल विचारल्यास वार्डन सांगतात की माझे इथे गरज नाही ते इतर कर्मचारी बघून घेतील.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कोणतेही प्रकारे सदर वस्तीगृहातील प्रशासन काळजी घेत नाही वस्तीगृहातील घाणीमुळे व मेष च्या निष्कृष्ट दर्जाच्या जेवणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे व विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत आहे तरी तात्काळ वार्डन विशाल सोनवल यांना गृहाचे व्यवस्थापन नियमानुसार करण्यास आदेशित करावे व वस्तुतिगृहाचे व्यवस्थापनामध्ये लक्ष देऊन काम करण्यास आदेशित करावे, किंवा सदर वस्तीगृहासाठी नवीन वार्डन देण्यात यावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष आकाश साळवे यांनी समाज कल्याण आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे केलि.
0 Comments