Ticker

6/recent/ticker-posts

मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गा जवळ शेतातील विहीरीमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

 



गजानन सरकटे

अंजनी बु:- अंजनी बुद्रुक येथील समृद्धी महामार्गाजवळ अंजनी शिवारात संतोष आल्हाट यांच्या शेतातील विहीरीमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळला संतोष आल्हाट हे आपल्या गुरांना सकाळी नऊ वाजता चारा अनन्या साठी शेतात गेले असता ते विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत एक माणूस तरंगत दिसला ते घाबरले व त्यांनी घराचा पंल्ला गाठला व गावांमध्ये येऊन त्यांनी सरपंच,व तंटामुक्ती अध्यक्ष यांना ही घटना सांगितली सरपंच व संतोष आल्हाट यांनी लगेच डोनगाव पोलिस स्टेशन मध्ये जाऊन कळविले की अंजनी बु येथे समृद्धी महामार्ग शेजारी अंजनी बुद्रुक शिवारामध्ये माझ्या शेतात लाल शर्ट व काळी पॅन्ट अशे कपडे असलेला व्यक्ती माझ्या शेतातील विहीरीमध्ये पाण्यात तरंगलेला आहे पोलीस स्टेशन येथे त्यांनी तक्रार केली लगेच तातडीने तक्रार नोंदविल्यानंतर पोलिस स्टेशन डोणगाव ची टीम व बिट जमदार यांनी शेतात जाऊन नागरिकांच्या साह्याने तो मृतदेह विहिरीतुन बाहेर काढून पंचनामा केला मृतक इसम हा नेमका कुठला आहे हे मात्र कळाले नाही, पुढील तपास डोणगाव पोलीस स्टेशन करीत आहेत.

Post a Comment

0 Comments