भागवत चव्हाण
जिंतूर : येथिल राजीनामा, अनह्रता व इतर कारणांमुळे जिंतूर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या नऊ सदस्यांच्या जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया दि १८ गुरुवारी रोजी पार पडल्या. दि.१९ शुक्रवार रोजी मतमोजणी होउन निकाल जाहीर झाले. दरम्यान नऊपैकी शिवप्रसाद नागनाथ दुभळकर (कान्हा), वंदना ज्ञानेश्वर चव्हाण (हंडी), अनुसया राठोड (चिंचोली-काळे), आणि मनिषा माणिक शेंगुळे (माक येथील दोनपैकी एक) हे चार उमेदवार सुरुवातीलाच बिनविरोध निवडून आले. तर मालेगाव-दुधना येथील जागेसाठी उमेदवारी अर्जच दाखल नसल्याने ही जागा रिक्त राहिली. सदरील मतदान प्रक्रियेत ग्रामपंचायतनिहाय निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे असून कंसात त्यांना मिळालेली मते. सावरगाव-सुभाष नामदेव ढवळे (१२६), दहेगाव-दीपक बन्सी वाटते (१८०), माक-सानिया खानम फारुख खान (१६१),
कौसडी येथे एका जागेसाठी चार महिलांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सारिका ज्ञानेश्वर जिवणे यांनी नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा दहा मतांची आघाडी घेऊन बाजी मारली.
0 Comments