Ticker

6/recent/ticker-posts

मुख्य चौकात सिने स्टाईल खून, एक गंभीर जखमी


दिवसाढवळ्या खून झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ

मनोज चव्हाण 

मानोरा:- शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान गजबजलेल्या ठिकाणी दोन युवकांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

 शिवाजी महाराज चौक मानोरा येथे शिवा विलास उघडे वय वीस वर्ष रा. बेलोरा (विठोली) आणि त्याचा मित्र राहुल मनोहर चव्हाण वय 25 रा. भूली हे उभे असताना अज्ञात मारेकरी मोटार सायकल वरून आले आणि त्यांनी  उघडे आणि चव्हाण यांचे वर धारदार चाकूने वार करून क्षनार्धात निघून गेले. या थरारक हल्ल्यात शिवाचा जागीच मृत्यू झाला असून राहुल हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी राहुल चव्हाण यास पुढील उपचारासाठी अकोला येथे तातडीने पाठविण्यात आले आहे. आरोपी हे मांगकिणी ता. दारव्हा येथील असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी स्थानिक घटनास्थळाचा दौरा करून स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत.


प्रचंड गर्दी असलेल्या भर चौकात सिनेस्टाईल दोन युवकावर सपासप वार करून दुचाकीने पळ काढणाऱ्या मारेकऱ्याच्या शोधाचे आव्हान स्थानिक पोलीस प्रशासना पुढे निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिग्रस चौक या गजबजलेल्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी वृत्तपत्रे सातत्याने लावून धरीत असूनही स्थानिक पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे कायम दुर्लक्ष असते, महामार्गांवर मात्र पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती नेहमी नजरेत भरीत असते हे उल्लेखनीय.

Post a Comment

0 Comments