Ticker

6/recent/ticker-posts

गुणवत्ता ही शाश्वत आणि चिरकाल टिकते - केंद्रप्रमुख किसन देशमुख

 


नवल राठोड

 देऊळगाव साकरशा स्थानिक जानेफळ येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेमध्ये जी. प. शाळा मोसंबी वाडी येथील मुख्याध्यापक प. रा. निकम यांचा सत्कार करण्यात आला.प. रा. निकम यांचे चिरंजीव जगन्नाथ परशराम निकम हे मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देत आहेत. एम पी एस सी च्या माध्यमातून भविष्यात चांगल्या पदावर काम करण्याची त्यांची इच्छा होती. नुकत्याच लागलेल्या विविध निकालांमध्ये भरघोस यश मिळवत ते तीन परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले असूनत्यांच्यासाठी कृषी अधिकारी, आय एफ सी (फूड कॉर्पोरेशन ), युनियन बँक ऑफ हैद्राबाद या तीनही पदांसाठी त्यांची निवड झाली असून. ते कोणते पद निवडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 त्यानिमित्त जानेफळ केंद्रातील सर्व मुख्याध्यापक बांधवांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. या निमित्ताने बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख कि. वा देशमुख यांनी जीवनात परिश्रमाला कोणताही पर्याय नसून, यशाला शॉर्टकट नाही. गुणवत्ता असेल तर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही आपली गुणवत्ता सिद्ध करू शकता असे मत  मांडले. शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रत्नाकर गवारे आपल्या प्रेरणादायी भाषणात बोलताना म्हणाले की, आज सरकारी नोकऱ्या दुरापास्त झाल्या असताना एकाच वेळी अतिशय महत्त्वाच्या अशा तीन पदांवर निवड होणे ही भविष्यात अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी घटना असून, यातून प्रेरणा घेऊन खेडेपाड्यातील विद्यार्थ्यांनी समोर येण्याची गरज आहे.याप्रसंगी मुख्याध्यापक पुंजाजी सवडतकर, के डी. राठोड,रत्नाकर गवारे, रामदास धामोडकर, सा. का. कृष्णा हावरे,अ. म. तुपकर, ग. शा. चांदणे,आर. ए. पागोरे, कु. वाघमारे,ए. डी. दिवटे,डी. व्ही. मावळे,एस. डी. मुटठे,आर. एस. जाधव,तीर्थराज खुरद, निकस सर,के डी. सपकाळ,ए. एस. कुलाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे यांनी केले. फराळ आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments