चायगाव व पार्डा येथिल घटना !
शेतक-यांचे तीन लाखाचे नुकसान !
कीसन लाटे
मेहकर :तालुक्यातील चायगाव व पार्डा परीसरात चो-यांचे प्रमाण दिवसेंन दिवस वाढत चालले असुन या भुरट्या चोरांचा बंदोबस्त होणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे शेतकरी वर्ग पुरता कोलमडुन गेलेला आहे अशा भुरट्या चोरांचा बंदोबस्त कधी होणार हा प्रश्न चायगाव व पार्डा व परीसरातील शेतकरी वर्गाला पडलेला आहे.
या आगोदरही भरपुर चो-या या परीसरात झालेल्या आहेत यामध्ये स्रिंकलर,पाईप,मोटरसायकल,विहीरी व धरणावरील मोटर,केबल ,शेतातील गोठ्यातील शेतमाल भरपुर प्रमाणात चोरी गेलेला आहे काही शेतक-यांनी तक्रारीही दिल्या परंतु काही चोरीच्या प्रकरणातीन आरोपी अद्यापही पकडल्या गेले नसल्यामुळे काही नुकसान ग्रस्त शेतकरी मुग गीळुन गप्प बसतात आणि कंटाळुन तक्रारीही देत नाहीत .
असाच प्रत्यय दि.१६/५/२३ रोजी चायगाव येथिल व १९ /५/२३ शेतकरी नानाराव देशमुख व आबाराव देशमुख व पार्डा येथिल विश्वनाथ तांगडे याना आला गोठ्यातील बैल दिवसभर शेतीकाम करुन संध्याकाळी नानाराव देशमुख यांचा सालदार गडी प्रमेश्वर रंजवे व आबाराव देशमुख यांचा मुलगा योगेश देशमुख हे चारावैरण करुण घरी आले व दुस-या दिवशी दि.१७ मे च्या सकाळी दुध काढण्यासाठी व चारा पाणी करण्यासाठी गेले असता गोठ्याचे कुलुप तोडलेल्या अवस्थेत दिसले व गोठ्यात बैल दिसले नाही तेव्हा शेजारी पाजारी चौकशी केली सर्व शेजा-यांना विचापुस केली असता बैल चोरीला गेले असल्याचे समजले तेव्हा त्यांनी घरी फोनद्वारे माहीती दीली व सर्वञ शोधाशोध केली कोठेही बैल मिळुन आले नसल्यामुळे लगेच नानाराव देशमुख यांचा लहान मुलगा दत्ताञय देशमुख व आबाराव देशमुख यांचा मुलगा योगेश देशमुख हे मेहकर पोलिस स्टेशनला गेले असता सकाळपासुन दुपारपर्यंत तक्रार दाखल करुन घेतली नाही तक्रार घेण्यास टाळाटाळ केली व उलटसुलट प्रश्न विचारत वेळ घालवला अशी माहीती सदर नुकसानग्रस्त शेतकरी दत्ताञय देशमुख यांचे मोठे बंधु गजानन देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठुन तक्रार दाखल करुण घेण्याची विनंती केली तेव्हा दुपार नंतर तक्रार दाखल करुन घेतली अशी माहीती सदर नुकसानग्रस्त शेतकरी गजानन देशमुख ,दत्ताञय देशमुख,यांनी पञकारांशी बोलतांना दिली सदर तीन्ही हवालदिल झालेल्या शेतक-यांचे जवळपास अडीच लाख (२,५०,००० रु)चे नुकसान झाले असुन सुध्दा मेहकर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. आगोदरच कोरोनाची माहामारी,गारपिट,आवकाळी पाऊस,उत्पन्नात होणारी घट,शेती मालाला भाव नसल्यामुळे, वाढत चाललेली महागाई आणि त्यातच वाढत चाललेले चो-यांचे प्रमाण, यामुळे शेतकरी वर्ग पुरता खचुन गेलेला असतांना सुध्दा जगचा पोशिंदा शेतकरी,कष्ठकरी यांचे ईतके नुकसान होऊन सुध्दा तक्रार घेण्यास टाळाटाळ का केली जाते ? व या भुरट्या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येईल का ? यांना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे यांना जर पकडण्यात पोलिसांना यश आले तर आणखी होणा-या चो-या बंद होतील व शेतक-यांचे होणारे नुकसान टळेल, असा यक्ष प्रश्न शेतक-यासमोर उभा आहे
0 Comments