Ticker

6/recent/ticker-posts

संग्रामपूर तालुक्यात बालमजुरांचे प्रमाण वाढले

 बालकामगार प्रतिबंध कायद्यानुसार" कार्यवाहीच्या प्रतीक्षेत 

 शेख कदीर 

 संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बालमजूर काम करताना पाहावयास मिळत आहे.

 14 वर्षाच्या आतील बालकांना शिक्षणापासून


वंचित ठेवणे हा बालकामगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा" आहे 

संग्रामपूर, वरवट बकाल, पातुर्डा फाटा, टुनकी, सोनाळा या प्रमुख गावांमधील हॉटेल, बार, ढाबे, रसवंती वर या सारखे किरकोळ रस्त्यावर व्यवसाय करणारे या ठिकाणी बालमजूर मोठ्या प्रमाणात काम करतांना दिसत आहेत. या मजुरांमध्ये ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीब व हलाखीची आहे त्यांचे मुले हे प्रामुख्याने काम करत आहेत. तसेच शेतामध्ये सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे. यामध्ये सुद्धा बालकामगार काम करत आहे. कायद्याने बाल मजूर यांना कामावर घेणे किंवा,  कामावर, ठेवणे गुन्हा असताना सुद्धा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बालमजूर काम करत आहेत. यामुळे मात्र या लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष करून आदिवासी भागातील ज्या बाल कामगारांचे आई,वडील,अशिक्षित आहेत ते त्यांच्या मुला मुलींना शेतामध्ये तसेच मिळेल त्या ठिकाणी कामावरती पाठवत आहेत. त्यामुळे आपले भवितव्य धोक्यात दिसून येत आहे विशेष या लहान वयामध्ये त्यांना विमल गुटखा यासारखे व्यसन सुद्धा लागण्याचे दाट शक्यता निर्माण होऊन.. याची कल्पना सुद्धा नसताना कोवळ्या वयामध्ये मुलांवर परिस्थितीमुळे काम करण्याची वेळ आली आहे. तर त्यांच्याकडून काम करून घेणारे तेवढेच जबाबदार आहेत. प्रशासनाने या गंभीर बावींकडे बाल कामगार प्रतिबंध कायद्यानुसार तातडीने  लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments