गजानन सरकटे
मेहकर:-तथागत ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांच्या आदेशानुसार दैनिक सेवाशक्ती टाईम्स चे मुख्य संपादक अंकोश राठोड यांची तथागत ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे
संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश या पाच राज्यात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना मोठ्या झपाट्याने वाढत आहे. शिक्षक, वकील, डॉक्टर, पत्रकार, पोलीस, आदी अनेक समाजसेवक तसेच तरुण, तरुणी, महिला वर्ग मोठ्या झपाट्याने या संघटनेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत. अन्याय अत्याचार, बेरोजगारी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला सबळीकरण यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्याचा अजेंडा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ही संघटना संपूर्ण भारत देशात घेऊन निघाली आहे. संविधान, आरक्षण, लोकशाही वाचवण्याचा लढा तीव्र करत आहे. संपूर्ण राज्यात तथागत ग्रुपचा झंझावात उभा राहत आहे या संघटनेत रोज शेकडो कार्यकर्ते,महिला, युवक, युवती मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत तथागत ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य या संघटनेची मुळे आता महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही रोवली जात आहेत महाराष्ट्रात तथागत ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांच्या आदेशानुसार दैनिक सेवाशक्ती टाईम्स चे मुख्य संपादक अंकोश राठोड यांची तथागत ग्रुप ऑफ महाराष्ट राज्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली आहे व सर्व स्तरावर त्याचे अभिनंदन करत आहेत.


0 Comments