पुरस्कार स्वरूपाचा मात्र प्रशासनाला विसर
फिरोजशाह
वाशिम:- ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी सरहद्द ता.रिसोड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.या निमित्त शासन निर्णयानुसार समाजासाठी योगदान देणाऱ्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आशा वर्कर मुक्ता भगवान भांदुर्गे व अंगणवाडी सेविका शारदा भिमराव देशमुख, रेखा प्रभाकर गवळी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान म्हणून सरपंच स्वप्निल देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक मुऱ्हेकर, तलाठी ससाने, महादेव वाघमारे, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप गाभणे उपस्थित होते.
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/ गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान शासन निर्णयानुसार समाजासाठी योगदान देणाऱ्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानुसार आज प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. परंतू पिंपरी सरहद्द येथे पुरस्कार प्राप्त महीलांना पुरस्काराच्या स्वरूपानुसार प्रशासनाला शाल, श्रीफळ व रोख रक्कम देण्याचा विसर पडला.
पुरस्काराचे स्वरूप
(१) सन्मानपत्र
(२) सन्मानचिन्ह
(३) शाल व श्रीफळ
(४) रोख रक्कम (५०० रू प्रती महीला)
0 Comments