१९९५ च्या बॅचचे स्नेहमिलन उत्साहात साजरे
गणेश राऊत
मेहकर : शाळेतील वर्गमित्र , विविध गमंती जमती , भांडण , मधल्या सुट्टी मधील डब्बा पार्टी , शाळेतील शिक्षकांनी केलेली शिक्षा , शिक्षकांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, इ. अनेक आठवणीना माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला . शहरातील श्री शिवाजी हायस्कूल मेहकर येथे सन १९९५ च्या १० विच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन दिनांक १६ में रोजी उत्साहात संपन्न झाले.
चला जुन्या आठवणीना उजाळा देऊया व परत एकदा बालपण जगुया ही टैग लाइन ठेऊन १९९४ च्या वर्गमित्रांनी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी हायस्कूल येथे केले होते,या स्नेहमिलन कार्यक्रमास १९९५ चे १० वित असणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढ़े होते तर प्रमुख अतिथि मध्ये त्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक सांगळे,सौभागे,लोढ़े,जोशी गायकवाड मगर,उगले आणि काळे सरअसे उपस्थित होते,सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष म्हस्के यांनी केले तर सुचिता रहाटे पुष्पा वानखेडे राखी चतुर्वेदी रूपाली देशमुख विलास लोढे प्रदिप गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदेश लोढ़े तसेच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला नंतर प्रमुख विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणीना उजाळा दिला,विशेष म्हणजे या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनी मुंबई,पुणे,बैतूल,बल्लारशाह आदि ठिकाणावरुन आले होते,कार्यक्रमास आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुदेश लोढ़े यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या स्नेहमिलन कार्यक्रमाची संकल्पना माजी विद्यार्थी गोपाल देशमुख यांनी मांडली एक वर्ष मेहनत घेऊन सर्वांना एकत्र केले त्यामुळे गोपाल देशमुख यांचा सर्व मान्यवर व वर्गमित्रांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुंबई वरून आलेल्या वंदना गव्हाळे व पल्लवी गवई यांनी सर्व विद्यार्थ्यांचा टावेल टोपी देऊन सत्कार केला,या वेळी सचिन लोढे, सचिन तिडके, संतोष राणे, अशोक ढोके,रमेश देबाजे,विजय खरात, सैय्यद अख्तर, प्रशांत कानोडजे,संतोष म्हस्के, विलास लोढे,मंगेश सांळुके, जगन्नाथ पांडे, प्रदीप गायकवाड, गणेश नागरे, हुसेन गौरवे, गजानन लोढे,शेख सत्तार, समाधान सरकटे,गणेश सौभागे, सुभान गवली, गणेश लष्कर,शेख आरिफ, संतोष बुळे, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल देशमुख यांनी केले तर आभार निसार अन्सारी यांनी व्यक्त केले.
0 Comments